पुणे,
Marathi Sahitya Sammelan 2025 तब्बल ३२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान यंदा साताऱ्याला मिळाला आहे. ९९ वे संमेलन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
महामंडळाचे Marathi Sahitya Sammelan 2025 अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. या बैठकीस उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.संमेलनाच्या स्थळासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. समितीने ५ ते ७ जून दरम्यान औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर आणि सातारा या स्थळांना भेटी दिल्या. या दौर्यानंतर ८ जून रोजी पुण्यात समितीची अंतिम बैठक झाली. त्यामध्ये साताऱ्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यानंतर महामंडळाच्या बैठकीतही या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रा. जोशी म्हणाले, “१९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. त्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा ही संधी साताऱ्याला मिळाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून शाहूपुरी शाखा या आयोजनासाठी सातत्याने पाठपुरावा करत होती.”आगामी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लवकरच निवड प्रक्रिया हाती घेतली जाणार असून, साहित्यिक Marathi Sahitya Sammelan 2025 व रसिकांमध्ये या संमेलनाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.