एचएसआरपी ऑनलाईन नाेंदणीत तांत्रिक अडचणी

नाेंदणी करताना वारंवार येताेय व्यत्यय

    दिनांक :08-Jun-2025
Total Views |
नागपूर,
HSRP online registration हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेटची (एचएसआरपी) ऑनलाईन नाेंदणी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. ऑनलाईन नाेंदणी करताना शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर ‘एरर’ दाखवताे आणि पुन्हा तिच प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे अनेक वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नव्या नंबर प्लेट लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने 30 जूनपर्यंतची मुदत दिल्याने अनेक वाहनचालक ऑनलाईन नाेंदणी करीत असल्याचे समाेर आले आहे.
 
 
 
HSRP online registration
ऑनलाईन HSRP online registration नाेंदणी नसलेल्या वाहनधारकांकडून 30 जूननंतर दाेन हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे दंडापासून वाचण्यासाठी अनेकांनी एचएसआरपी नंबर प्लेटची ऑनलाईन नाेंदणी करणे सुरु केले आहे. दाेन हजार रुपयांचा दंड भरण्यापेक्षा साडेपाचशे रुपयांत ऑनलाईन नाेंदणी करुन नवी नंबर प्लेट मिळवणे साेपे असल्याने सध्या ऑनलाईन नाेंदणी करणाèयांची संख्या अचानक वाढत आहे. मात्र, अनेकांना ऑनलाईन नाेंदणी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. बुकिंग करताना पहिल्याच पेजवरील माहिती भरल्यानंतर ‘एरर’ येताे. बरेच वेळा अर्ज भरल्यानंतर दुसèया पेजवरील माहिती भरल्यानंतर अर्ज ‘सबमिट’च हाेत नाही. त्यामुळे अनेकांची डाेकेदुखी वाढली आहे. वारंवार अर्ज भरण्याचा प्रयत्न केला तरी अर्जात त्रृटी दाखवल्या जातात. तसेच अर्जातील पत्ता या डब्ब्यात पत्ता लिहिल्यानंतरही ‘स्पेशन कॅरेक्टर’ लिहिल्यामुळे अर्ज पुढे सरकत नाही. प्रत्यक्षात मात्र, त्यामध्ये काेणतेही ‘स्पेशन कॅरेक्टर’ नसते. यासाेबतच वाहनांचा इंजिन नंबर आणि चेचीस नंबर अचूक लिहिल्यानंतरही चुकीचा नंबर टाकल्याचे दर्शवते. त्यामुळे अनेक जण ऑनलाईन नाेंदणी करताना अक्षरशः वैतागून जात आहेत.
 
 
आरटीओ विभागाने केले हात वर
 
 
ऑनलाईन फार्म  भरताना तांत्रिक अडचणी येत असतील तर आरटीओ विभाग त्यामध्ये काहीही करु शकत नाही. कारण एचएसआरपीसाठी ऑनलाईन नाेंदणी करण्यासाठी खासगी तीन संस्थांना काम देण्यात आले आहे. तांत्रिक चुका झाल्यात आरटीओ नव्हे तर तीन कंपन्या जबाबदार आहेत. त्यांना फोन  करुन नागरिकांनी विचारावे आणि ऑनलाईन नाेंदणी करावी, अशी भूमिका घेऊन आरटीओ विभागाने हात वर केले आहे.
 
 
 
 

जिल्ह्यात अल्प प्रतिसाद
 
शहराच्या तुलनेत HSRP online registration ग्रामीण भागात एचएसआरपी नंबर प्लेट ऑनलाईन नाेंदणीला अल्प प्रतिसाद आहे. नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयात 5 लाख 62 हजार 710 वाहनांची नाेंद आहे. त्यापैकी 1 लाख 25 वाहनधारकांनी नाेंदणी केली असून आतापर्यंत 78 हजार नव्या नंबर प्लेट वाहनांना बसविल्या आहेत.
एचएसआरपी प्लेटसाठी ऑनलाईन नाेंदणी करण्याचे कंत्राट खासगी तीन कंपन्यांकडे आहे. ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचण आल्यास कंपन्यांच्या टाेलफ्री  क्रमांकावर फोन करुन समाधान करुन घ्यावे. आरटीओ विभाग त्यासाठी काहीही करु शकत नाही. िफटमेंट सेंटरवर आलेल्या समस्या साेडविण्यास आम्ही कटिबद्ध आहाेत.
- विजय चव्हाण (प्रादेशिक परिहवहन अधिकारी, ग्रामीण)