VIDEO अक्षय कुमारने थिएटर बाहेर असे का केले?

08 Jun 2025 14:57:33
मुंबई,
house full 6 movie अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘हाऊसफुल ५’ ६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला असून अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने ५० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. विनोद आणि रहस्य यांचा सुरेख मेळ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त पसंती लाभत आहे.
 
 

house full 6 movie  
या चित्रपटात २० हून अधिक कलाकार असून अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, सोनम बाजवा, जॉनी लिव्हर, झाकी श्रॉफ आणि संजय दत्त यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतात. चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट दोन वेगवेगळ्या व्हर्जन्समध्ये प्रदर्शित झाला आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही व्हर्जन्समध्ये वेगवेगळे किलर आहेत. प्रेक्षकांना हा ट्विस्ट खूपच आवडला असून रहस्याच्या जलव्यामुळे विनोदीपटाला एक वेगळीच रंगत आली आहे.
 
 
दरम्यान, house full 6 movie  अक्षय कुमारने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयने किलर मास्क घालून थिएटरबाहेर आलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधला. अगदी साध्या शर्ट-पँटमध्ये वावरणारा अक्षय लोकांमध्ये मिसळून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेताना दिसतो. ‘हाऊसफुल ५’ कसा वाटला, हे विचारण्यासाठी त्याने स्वत:ची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी प्रेक्षकांनी त्याला ओळखलेच.व्हिडिओ शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले आहे, “हाऊसफुल ५ हा चित्रपट किलर मास्क घालून पाहिल्यानंतर येणाऱ्या लोकांना मी विचारायचे ठरवले की त्यांना तो कसा वाटला. मी शेवटी पकडला जाणार होतो पण त्याआधीच पळून गेलो. छान अनुभव.”चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत असून त्यांच्या संवादफेकीला आणि शैलीला प्रेक्षक भरभरून दाद देत आहेत. विनोदाचा स्फोट आणि रहस्याचा थरार यांचा उत्कृष्ट संगम असलेला ‘हाऊसफुल ५’ बॉक्स ऑफिसवर मोठा यश मिळवतोय, हे निश्चित!
 
 
Powered By Sangraha 9.0