अभ्यंकरनगरात ‘द बर्निंग कार’

    दिनांक :09-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Abhyankarnagar accident अभ्यंकर नगरातून माटे चाैकाकडे जाणाऱ्या स्त्यावर अचानक एका चालत्या कारने पेट घेतला. चालकाने वेळीच कारमधून बाहेर निघून स्वःताचा जीव वाचवला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. काही मिनिटांतच अग्निशमन दलाचे दाेन बंब पाेहचले. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग विझवली. मात्र, कार पूर्णपणे जळून खाक झाली हाेती.
 
 
Abhyankarnagar accident
 
लक्ष्मीनगर ते माटे चाैकाकडे जाताना मध्ये असलेल्या अभ्यंकर नगर चाैकातून एक कार भरधाव जात हाेती. मात्र, कारमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे चालत्या कारने पेट घेतला. Abhyankarnagar accident चालकाच्या लगेच लक्षात आले. त्याने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. कारमधून लगेच बाहेर पळ काढला. कार जळताना बघून अनेकांनी रस्त्यावर गर्दी केली. अग्निशमन दलाने तत्परता दाखवून घटनास्थळ गाठले. मात्र, ताेपर्यंत कार जळून खाक झाली. अनेकांनी जळत्या कारचे माेबाईलने ाेटाे आणि व्हिडिओ घेतले. काही मिनिटांतच ते व्हिडिओ साेशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणी बजाजनगर पाेलिसांनी घटनेची नाेंद घेतली आहे.