वर्धा,
Gram Panchayat Office Satoda ९ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय साटोडा येथे सरपंच बादल उर्फ हरीश विरूटकर यांचेवर अविश्वास ठराव घेणेसाठी विशेष सभा घेण्यात आली. अध्यासी अधिकारी तहसीलदार संदीप पुंडेकर, ग्रामविकास अधिकारी विलास नव्हाळे, विस्तार अधिकारी सुनिल गावंडे,मंडळ अधिकारी आदे यांचे उपस्थितीत सभा सुरु झाली. विषय होता सभागृहात विश्वासात न घेता कामकाज करणे त्यावेळी बाजू मांडताना सरपंचांनी सांगितले की प्रत्येक सभेला सदस्य प्रोसेडिंग वर सही करतात.

त्यामुळे सर्व काही बरोबर आहे. विषयाची बाजू मांडताना ग्रामपंचायत सदस्य अजय जानवे यांनी सांगितले की गावाच्या विकासाकरिता प्रशासकीय मंजुरी द्यावीच लागते. त्याशिवाय कामे करताच येत नाही खरेदी करतांना वस्तूची पत, कंपनी, बाजारभाव पाहून खरेदी करावी लागते. Gram Panchayat Office Satoda १५ वा वित्तआयोग अंतर्गत घरगुती कचरा कुंडी खरेदी करण्यात आली त्याची मार्केट मधील किंमत १०० रुपयापेक्षा कमी असतांना जे. एम. वर २४९ रुपये किंमत बिलामध्ये लावन्यात आली एकूण १६. ४४ लक्ष रुपयाची खरेदी केली. तसेच ४ लोकल वॉटर कुलर खरेदी केली त्याची प्रति नग ४३००० रुपये बिल लावण्यात आले. नामवंत ब्लु स्टार कंपनीचा वॉटर कुलर २६००० रुपयाचा आहे.
अश्या प्रकारे लाखो रुपयाची खरेदी ही जादा दराने खरेदी केली. आजपर्यंत असाच कारभार सुरु होता.सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करणे या कारणामुळे १३ सदस्यांनी हात वर करून ठरवाच्या बाजूने मतदान केले.सभेला १४ सदस्य उपस्थित होते. ठरावाच्या विरोधात स्वतः सरपंच यांनी हात वर केला. Gram Panchayat Office Satoda ठरावाच्या बाजूने ३/४ मते असल्यामुळे ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. सभेमध्ये उपसरपंच प्रितीताई शिंदे, लता कोपरकर, कल्पना वाटकर गैरहजर होते. ग्रामपंचायत मध्ये ३/४ सदस्य कामकाज वर आक्षेप घेत जनतेच्या पैशाचा चुकीच्या पद्धतीने वापर होत असतांना विरोध करतात. बाकी सदस्य गैरहजर असल्यामुळे गावामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.