वर्धा,
Tarun Bharat Sanskar वेद काळापासुन वृक्षारोपनाची संस्कृती आहे. परंतु, आज ती काळाची गरज ठरते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वृक्षप्रेम होतेच. याशिवाय क्ररकर्मा औरंगजेबही निसर्ग आणि पक्षांच्या प्रेमात होता. झाडं ऑसिजन देतात. झाडं रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सर्वात चांगला नमुना आहे. झाडाच्या बुद्याखाली पाणी असतं. झाडांमध्ये जाणारं पाणी मातीत जातं. तरुण भारताने एक पिढी घडवली आहे. दुसर्या पिढीकडे हस्तांतर करताना त्यांनी वृक्षारोपणासारखी मोहीम हाती घेतली. वृक्ष संस्कार नवीन पिढीवर होणे आवश्यक आहे. त्यामुळे तरुण भारत राष्ट्रवादी विचारासह आता वृक्ष संस्कारही जोपासत आहे, ही बाब प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ व वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले.

दैनिक तरुण भारतची शताब्धी व श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज ९ रोजी वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला हॉटेल तंदूर येथे आयोजित वटवृक्ष रोपटे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे होत्या. Tarun Bharat Sanskar प्रा. मयूरी देशपांडे, जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास, या अभियानाच्या संयोजक माधवी व्यास यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. पावडे पुढे म्हणाले की, निसर्ग, झाडं हे आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. वृंदावन असेल तिथे स्मशान होऊ शकत नाही. निसर्ग आपली काळजी घेतो. आज तरुण भारतच्या वतीने वटवृक्ष रोपटं वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ती परंपरा जोपासल्या गेली. Tarun Bharat Sanskar वटवृक्षाचं महत्त्व आत्मसात करावे आणि नवीन पिढीकडे समृद्ध निसर्ग सोपवा, असे आवाहन डॉ. पावडे यांनी केले. संचालन माजी शिक्षण सभापती श्रेया देशमुख यांनी केले. प्रास्ताविकात प्रफुल्ल व्यास यांनी तरुण भारतची परंपरा आणि भविष्यातील अभियानाची माहिती दिली. अभियान संयोजक माधवी व्यास यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी धनश्री बाराहाते, रेणुका डेहाडराय, रोहिणी लिखीतकर, आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला गुरुद्वारा समिती, चन्नावार इ विद्यामंदिर, माळी समाज, वर्धा नागरी बँक, न्यू इंग्लिश हायस्कूल, विमेन्स एज्युकेशन, सरस्वती विद्या मंदिर, वैद्यकीय जनजागृती मंच, करुणाश्रम, गजानन लिला रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटी, भारतीय जनता पार्टी, अष्टभूजा मंदिर, Tarun Bharat Sanskar सांदीपनी स्कूल, साई मंदिर, स्कूल ऑफ ब्रिलियन्टस्, माहेश्वरी मंडळ, सावरकर स्मारक समिती, अहिल्या देवी समिती, मातृसेवा संघ, एवोनिथ स्टिल, आशा वर्कर्स, नम्रता गुरुदेव भजनी मंडळ, अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
वृक्षारोपन संस्कार व्हावा : डॉ. पाराजे
नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पारासे यांनी तरुण भारतच्या या अभियानाचे कौतुक करताना स्त्री निर्मितीचे प्रतिक आहे. तसेच निसर्गही आपल्याला भरभरून देतो. Tarun Bharat Sanskar घरात आईचे जेवढे स्थान तेवढेच झाडाचेही आहे. भविष्यात पैसे देऊनही ऑसिजन मिळणार नाही. त्यामुळे वृक्षारोपणाकडे आता ही संस्कृती म्हणून जोपासावी लागणार आहे. सोळा संस्कारात आता वृक्षारोपन ही संस्काराचा भाग व्हावा असे डॉ. पाराजे म्हणाल्या.
वटवृक्षच गुणकारी : प्रा. देशपांडे
हिंदू संस्कृतीमध्ये सर्वच झाडं पवित्र आणि पूजनीय आहेत. आपण वेळोवेळी झाडांची पूजा करतो. त्यापैकी वटवृक्ष हे २४ तास ऑसिजन देतो. वटवृक्षापासुन २६० पाऊंड ऑसिजन वर्षभर्यात मिळतो. वटवृक्ष हा पुर्णपणे उपयोगात येणारा वृक्ष आहे. विशेष करून महिलांच्या आजारावर वृक्षवृक्ष हा रामबाण उपाय आहे. वट वृक्षाचे पंचांग आहे. सांधेदुखी, वात, चेहर्यावरील वांग, त्वचा या आजारावर वड एक गुणकारी औैषध आहे. Tarun Bharat Sanskar सात जन्माची कथा आपण जी ऐकतो ती पतीसाठी असली तरी महिलांच्या आरोग्याशी निगडीत आहे. महिला आयुष्यात वेगवेगळ्या स्थितीत सात जन्म अनुभवते म्हणून सात जन्म ही कथा असल्याचे डॉ. मयुरी देशपांडे म्हणाल्या.
तभाने धावपळ थांबवली : पाटील
तरुण भारतने यापूर्वी बिया पोहोवल्या आता वडाची झाडं तेही वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला आमच्या हाती दिले. त्यामुळे उद्या सकाळी उठून वटवृक्ष पूजनाची धावपळ आमची थांबणार आहे. Tarun Bharat Sanskar आपण स्वत: वडाची पूजा करीत नाही. परंतु, तभाच्या आजच्या कार्यक्रमातून जी माहिती मिळाली त्यामुळे आपण स्वत:साठी वडाच्या झाडाचे पूजन करू, अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया माळी समाजाच्या जिल्हाध्यक्ष रोहिणी पाटील यांनी दिली.