हिंगणघाट,
Thunderstorm in Hinganghat आज झालेल्या अवकाळी पावसामुळे नजीकच्या बोरगाव(नां) येथे घरांचे छप्पर उडून मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. अनेक घराच्या भिंती पडल्या आणि झाडेसुद्धा उन्मळून पडली. आज झालेल्या याच अवकाळी पावसामुळे मौजा-वेणी,सास्ती तसेच धोची येथील अनेक घराचे छप्पर उडाले.अनेक घरांची पडझड झाली असून येथसुधा मोठी झाडे धाराशायी झाली असल्याची माहिती आहे.