शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घ्यावी: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

09 Jun 2025 21:21:11
बुलढाणा,
Prataprao Jadhav विकसित कृषी संकल्प अभियान शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यामधील संवाद अधिक बळकट करण्याकरिता मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यापीठ आणि कृषी शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले विविध संशोधन, तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत अधिक जलद गतीने पोहोचविण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेऊन संशोधनाला नवीन दिशा मिळणार आहे. त्याचा लाभ शेतकरी बांधवानी घ्यावा असे आवाहन आयुष्य राज्यमंत्री व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
 

Prataprao Jadhav 
 
कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियानाच्या आयोजित कार्यक्रमात ना. प्रतापराव जाधव बोलत होते. Prataprao Jadhav यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम तहसीलदार संतोष काकडे, कृषि विज्ञान केंद्राच्या डॉ. भारती तिजारे (कृषिविद्या विभाग), डॉ. वाडकर (विस्तार शिक्षण), केळवद येथील प्रगतशील शेतकरी प्रतापराव पाटील आणि शेतकरी बहुसंख्यने उपस्थित होते.
 
 
राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानाची माहिती देत शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यामधील संवाद अधिक बळकट करण्याकरिता हे अभियान असल्याचे सांगितले. शास्त्रज्ञांनी निर्माण केलेले तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. मृदा परीक्षण, मृदा आरोग्य पत्रिकेचे वाचन, बियाण्यांची निवड, खतांचा योग्य वापर, Prataprao Jadhav लागवड पद्धती, शेतीमधील नवीन तंत्रज्ञान जसे ड्रोनचा फवारणीसाठी वापर, रासायनिक कीटकनाशकांच्या ऐवजी जैविक कीटकनाशक व बुरशीनाशकांचा वापर शेतीमध्ये करावा या केंद्राकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान समजून घेऊन कमी खर्चामध्ये अधिक फायद्याची, नफ्याची शेती कशी करता येईल यांचे तंत्र शास्त्रज्ञांकडून समजावून घ्यावे, असे आवाहनही ना. प्रतापराव जाधव यांनी केले.
 
 
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देत शेतकर्‍यांनी ऑनलाइन पद्धतीने या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी, Prataprao Jadhav असे आवाहन केले. कृषि विज्ञान केंद्राच्या ठिकाणी सातत्याने भेट देऊन नवीन तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे, जेणेकरून शेती करणे फायद्याचे होईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार योगेश सरोदे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0