कारची झाडाला धडक दोघे जागीच ठार, १ गंभीर जखमी

01 Jul 2025 11:47:24
गोंदिया, 
Car Accident भरधाव कारची रस्त्थाच्या कडेवरील बीजाच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू, तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज, मंगळवार १ जुलै रोजी पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास देवरी-चिचगड मार्गावर परसटोला शिवारात घडली. राजा भारती (३५), सोहेल शेख (३२) असे मृतांची नावे असून सलमान शेख(२५) असे गंभीर युवकाचे नाव आहे.
 

car accident 
 
 
देवरी येथील तीन युवक कार क्रमांक सी.जी. ०८ आर ६२५५ देवरी-चिचगड मार्गावरून देवरीकडे येत असताना परसटोला शिवारातील फॉरेस्ट नाक्याजवळ चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेवरील बीजाच्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात राजा भारती व सोहेल शेख या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मागच्या सिटवर बसलेला सलमान शेख सिटमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाल्याने अपघाताचा आवाज ऐकताच नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नागरीकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अपघातात वाहनाचा पुर्णतः चेंदामेंदा झाल्याने पोलिस व नागरिकांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. यावेळी गॅस कटरच्या सहाय्याने मृतदेह व जखमीला बाहेर काढण्यात आले.Car Accident यानंतर जखमी युवकाला उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. देवरी पोलिसांकडून घटनेची नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
तीन तासाचा अथक प्रयत्न..
कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे मृतदेह व जखमी युवक वाहनात चांगलेच अडकून होते. तीन तासाच्या शर्तीचे प्रयत्नानंतर मृतदेह व जखमीला बाहेर काढण्यात यश आले.
Powered By Sangraha 9.0