तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Health workers' problems : शासनस्तरावर राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या तत्काळ मान्य करण्यात याव्या. याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांना निवेदन देण्यात आले. या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य कर्मचाèयांचे सातत्याने उशिरा होणारे पगार, आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाèयांना अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळणे, खुल्लर समितीच्या वेतन निश्चितीनुसार वेतन अदा करणे, टीम बेस इन्सेन्टिव्ह दरमहा अदा करणे, यात लक्ष घालण्यात यावे.
तसेच आदर्श आरोग्य सेवक पुरस्कार देण्यात यावा, पदोन्नती त्वरित निकाली काढण्यात याव्या, संघटनेसोबत त्रैमासिक स्वतंत्र बैठक घ्यावी, दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना फाईल निकाली काढण्यात यावी, पाणी नमुने संदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात यावी, याही मागण्या तत्काळ मान्य करण्यात यावा.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब तांदळे, जिल्हाध्यक्ष जय तिजारे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश देशमुख, रवीकुमार बाबरे, कोषाध्यक्ष युवराज जाधव व संघटक भगवान खोकले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.