अवैध रेती दोन कर्मचार्‍यांवर शेकणार

* दोघं निलंबित करण्याची महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा

    दिनांक :01-Jul-2025
Total Views |
आर्वी, 
Chandrashekhar Bawankule : तालुक्यातील देऊरवाडा घाटावरील अवैध रेती उपसा व साठवणूक प्रकरणी आ. दादाराव केचे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. प्रकरणी त्याभागातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषदेमध्ये आज १ जुलै रोजी केली.
 
 
jlk
 
तालुयातील देऊरवाडा घाटावर वर्धा नदीवर अवैध रेतीच्या मोठ्या प्रमाणावर उपसा व वाहतूक होत होती. मात्र, महसूल विभागाने कारवाई केली नाही. २६ एप्रिल रोजी आपण देऊरवाडा घाटावर जाऊन होत असलेल्या उत्खननाची पाहणी व माहिती घेतली. त्या ठिकाणी शेकडो ब्रास रेती काढलेली आढळली. बोटीच्या माध्यमातून नदी पात्रातून पाईप द्वारे रेती काढण्यात येत होती. रेतीचा उपसा करणारे साहित्य पडून होते. देऊरवाडा येथील पटवारी यांना सोबत घेऊन घाटाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर रेतीचे ढिगारे आढळून आले. मात्र, त्या भागातील तलाठी मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस पाटील इतर महसूल अधिकारी असताना मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा व विक्री व साठवणूक होत होती.
 
 
गोरगरिबांना घरकुलाला वाळू मिळत नाही. मात्र, रेती तस्कर मोठ्या प्रमाणावर रीतीने देऊरवाडा घाटावरून अवैध पद्धतीने रेतीचा उपसा व वाहतूक व साठवणूक करत आहे. त्यामुळे रेती तस्करावर आपण कारवाई करणार आहात का असा प्रश्न आ. केचे यांनी उपस्थित केला असता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तलाठी व मंडल अधिकारी या दोन कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात येईल अशी घोषणा केली. तसेच जप्त करण्यात आलेला रेतीसाठा घरकुलाकरिता देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.