नागपूर,
Kanchan Gadkari : माती आणि माता याे दाेघींमध्येच नवसृजनाची ताकद आहे. बीज रुजविले की माती आपले कर्तव्य पार पाडतेच. पण तिच्याशी कधी काळी घट्ट असलेली स्त्रियांची नाळ तुटत चालली आहे. नव्याने ती घट्ट जाेडत शेतीकडे स्त्रियांनी वळावे, असे कळकळीचे आवाहन प्रयाेगशील शेती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी केले. शेती नसली तरी घरच्या परसबागेतही कुटुंबासाठी जैविक भाजीपाला पिकविला जाऊ शकताे असेही त्या म्हणाल्या.
वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने मंगळवारी कांचन गडकरी यांना ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डाॅ. सी. डी. मायी यांच्या हस्ते ‘प्रयाेगशील शेती पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. 30 हजार रुपये राेख, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष डाॅ. गिरीश गांधी हाेते. व्यासपीठावर डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. निलय नाईक, सचिव प्रगती पाटील, पर्यावरणतज्ज्ञ डाॅ. अजय पाटील यांची प्रमुख उपस्थित हाेती.
पुरस्कार स्वीकारण्यामागील पार्श्वभूमी विशद करताना कांचन गडकरी म्हणाल्या, मला पुरस्कार कधीच नकाे हाेता. मंत्र्याची बायकाे पुरस्कार घेते अशी टीका माझ्यावर हाेईल याची मला कल्पना हाेती. परंतु नितीन गडकरी यांनीच ‘26 वर्षांपासून तू धापेवाडा येथील शेतीमध्ये करीत असलेले प्रयाेग या पुरस्काराने लाेकांना कळतील’ हा विश्वास मला दिल्याने मी ताे स्वीकारला. नितीनजींचे मार्गदर्शन आणि प्राेत्साहनामुळेच मी शेतीचे प्रयाेग करीत आहे. शेतीचा वारसा मला आईकडून मिळाला. शेती आणि गायीचे महत्त्व सासूबाई नेहमी सांगायच्या. त्यामुळे दाेन्ही कडून मिळालेला वारसा, अनेकांचे सहकार्य, पाणी, मृदा आणि वेळेचे याेग्य व्यवस्थापन यामुळे विविध प्रयाेग करता आल्याचे त्या म्हणाल्या. अजूनही शासकीय याेजना शेतकऱ्यांपर्यंत नसल्याची खंतही त्यांनी बाेलून दाखविली.
अध्यक्षीय भाषणात डाॅ. गिरीश गांधी म्हणाले, केंद्रीय मंत्र्याची पत्नी असतानाही कांचन गडकरी यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपले आहे. अनेक सामाजिक जबाबदाèया सांभाळून त्यांना केलेले शेतातील अभिनव प्रयाेेग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. या जाेेडप्याचा महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही अभिमान असल्याचे गाैरवाेद्गार त्यांनी काढले. प्रास्ताविक अॅड. नीलय नाईक यांनी केले. डाॅ. अजय पाटील यांनी कांचन गडकरी यांचा परिचय करून दिला. संचालन प्रगती पाटील यांनी केले तर आभार बाळ कुळकर्णी यांनी मानले. यावेळी कांचन गडकरी यांच्या आई, मुलगी व सुनांसह अनिरूद्ध पाटील, हेमंत गांधी, प्रकाश इटनकर, आत्माराम नाईक, डाॅ. सुजाता नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हाेते.
स्त्रियांना हा पुरस्कार प्राेत्साहित करणार - डाॅ. सी. डी. मायी
भारतीय कृषी क्षेत्रात हायब्रिड तंत्रज्ञान रुजविण्याचे कार्य वसंतराव नाईक यांनी केले. हरितक्रांतीत सिंहाच वाटा असलेल्या नाईक यांच्या नावाने कांचन गडकरी यांना दिलेला पुरस्कार महिलांना प्राेत्साहित करणारा आहे. नवीन तंत्रज्ञानाशिवाय शेतीक्षेत्रात बदल हाेणे शक्य नाही. गडकरी दांपत्याने धापेवाडा येथे त्यांच्या शेतात केलेले प्रयाेग नक्की पाहण्यासारखे आणि प्रेरणा घेण्यासारखे आहे असे डाॅ. सी. डी. मायी यावेळी म्हणाले.
सन्मानाने आता जबाबदारी वाढली - डाॅ. शरद गडाख
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शेती आणि शेतकèयांवर असलेले प्रेम सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कृषिमंत्रीच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाच कांचन गडकरी करीत असलेले शेतीतील नवनवे प्रयाेग करतात व इतरांना दिशा देणारे आहेत. पण या सन्मानाने जबाबदारी वाढली आहे, असे डाॅ. शरद गडाख यावेळी म्हणाले.