तभा वृत्तसेवा
दारव्हा,
Sanjay Rathod : मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दारव्ह्यातील साई मोबाईल गॅलरीचे संचालक सूरज मदनलाल काशीकर यांनी आगळीवेगळी शुभेच्छा दिली.
त्यांनी दारव्हा येथील मल्लिकार्जुन मंदिर येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली. यवतमाळ येथे जाण्याकरता त्यांना तीन तासांचा अवधी लागला. संजयभाऊंना अशी वाढदिवसाची भेट मी स्नेहापोटी दिली, असे त्यांनी सांगितले.
मी दैनंदिन सायकलचा प्रवास करतो त्यामुळे माझ्या शरीराला अपेक्षित व्यायाम होतो आणि शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते. या प्रवासादरम्यान मित्रपरिवाराने सोबत राहून सहकार्य केले.
सूरज काशीकर यांनी या आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिलेल्या शुभेच्छांचा पालकमंत्री संजय राठोड यांनी स्वीकार केला. सूरजचे अभिनंदन आणि कौतुक केले.