महावितरणच्या ‘गो-ग्रीन’मध्ये पर्यावरणस्नेहींचा 5 लाखांचा टप्पा

01 Jul 2025 21:26:31
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Mahavitaran-Go-Green : वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’ पर्याय निवडणाèया ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’मध्ये 5 लाखांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये अमरावती परिमंडळांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 8,400 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 5 हजार 593 ग्राहकाचा समावेश आहे.
 
 
y1July-Go-Green-Logo
 
या योजनेत सोमवार, 30 जूनपर्यंत सहभागी 5 लाख 3 हजार 795 वीजग्राहकांना 6 कोटी 4 लाख 55 हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी यात सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी केले.
 
 
वार्षिक 120 रुपयांचा फायदा महावितरणकडून पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजनेतून वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. कागदी बिलाऐवजी फक्त ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक 120 रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे.
 
 
विशेष म्हणजे, ‘गो-ग्रीन’ पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील 12 महिन्यांची म्हणजे 120 रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी 10 रुपये प्रत्येक बिलामध्ये मिळत होती.
 
 
वीजग्राहकांसाठी ऐच्छिक ‘गो-ग्रीन’ योजनेला राज्यात प्रतिसाद वाढत आहे. या योजनेत आतापर्यंत 5 लाख 3 हजार 795 वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना 6 कोटी 4 लाख 55 हजार 400 रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
 
 
महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संबंधित ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येते. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास 1 टक्का सवलत दिली जाते. त्यासाठीही वीजबिल तत्काळ ऑनलाईनद्वारे भरणे सोयीचे झाले आहे.
Powered By Sangraha 9.0