'ग्लॅमरच्या दुनियेतून भक्तीमार्गाकडे'

अभिनेत्री प्रियांका पंडितचा वृंदावनमध्ये नवजीवनाचा प्रवास

    दिनांक :10-Jul-2025
Total Views |
वृंदावन,
Actress Priyanka Pandit एकेकाळी भोजपुरी चित्रपटसृष्टीत नावाजलेली अभिनेत्री प्रियांका पंडित हिने आता ग्लॅमरच्या दुनियेला रामराम ठोकत अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. तिचा हा परिवर्तनशील प्रवास अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारा ठरतोय. भोजपुरीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक मानली जाणारी प्रियांका, आज कृष्णभक्तीमध्ये रमलेली असून, वृंदावनमध्ये गुपचूप विवाह करीत स्थायिक झाल्याची माहिती तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर आली आहे.
 
 

Actress Priyanka Pandit The path of spirituality has been adopted. 
यशस्वी कारकिर्दीकडून अपयशाच्या सावटाकडे
 
 
प्रियांका पंडितने Actress Priyanka Pandit भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली होती. खेसारी लाल यादव, पवन सिंह, रितेश पांडे यांसारख्या स्टार्ससोबत तिने यशस्वी चित्रपट केले. चाहत्यांनी तिच्यावर भरभरून प्रेमही केले. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात एक मोठा वळण आले – एक बनावट एमएमएस व्हायरल झाल्यानंतर तिची प्रतिमा समाजात आणि इंडस्ट्रीत धुळीस मिळाली. यातून ती वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या खचली. तिचे तिच्या प्रियकरासोबतचे नाते तुटले, काम मिळणंही थांबलं.या सगळ्या प्रसंगांनंतर प्रियांकाने स्वतःला कृष्णभक्तीत झोकून दिलं. तिने वृंदावन गाठलं आणि प्रेमानंद जी महाराजांच्या शिष्येपदी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. तिथेच ती 'हरी सेवक' या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या एका व्यक्तीसोबत गुपचूप विवाहबद्ध झाली. सध्या ती आपल्या नवऱ्यासोबत वृंदावनमध्ये शांत, भक्तीमय जीवन जगत आहे.
 
 
सोशल मीडियावरून दिले विवाहाचे संकेत
 
 
प्रियांका पंडित सध्या सोशल मीडियावर सक्रिय असून ती इंस्टाग्रामवर भक्तीपर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या लग्नाचे काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये तिच्या पतीचा चेहरा दाखवलेला नसून, दोघांनी हातात हात घेतलेला एक फोटो तिने शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने 'Hari Sevak' नावाच्या अकाउंटला टॅग केलं असून, हेच तिच्या पतीचं इंस्टाग्राम अकाउंट असल्याची चर्चा आहे.
प्रियांकाच्या पोस्ट्सवरून तिचा कृष्णावर प्रगाढ विश्वास स्पष्ट दिसून येतो. तिने अनेक ठिकाणी लिहिलं आहे की, “कृष्णाचा स्वीकार हीच खरी मुक्ति आहे.” तिचं हे जीवन आता चित्रपटांपासून दूर असलं तरी भक्तीने परिपूर्ण आहे. तिच्या पोस्ट्सना चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.