दिलासा! शेतकऱ्यांना 379 कोटी रुपयांची नुकसानभरपाई

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती

    दिनांक :11-Jul-2025
Total Views |
मुंबई,
Crop Insurance Compensation खरीप हंगाम 2024 साठी पीकविमा योजनेंतर्गत अद्यापही प्रलंबित असलेल्या नुकसानभरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसमावेशक पीकविमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेली तब्बल ३७९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई विमा कंपनीकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
 

Crop Insurance Compensation  
राज्य सरकारने खरीप हंगाम 2024 साठी विमा हप्त्याकरिता १०२८.९७ कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केल्यामुळे ही कार्यवाही शक्य झाली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी (१० जुलै) जाहीर करण्यात आला असून, या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या पीकविमा पोर्टलद्वारे लवकरच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
 
 
आतापर्यंत किती नुकसानभरपाई मिळाली?
 
 
खरीप हंगाम Crop Insurance Compensation  2024 मध्ये आतापर्यंत ३९०७.४३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली होती. यापैकी ३५६१.०८ कोटी रुपये आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. मात्र, ३४६.३६ कोटी रुपयांची रक्कम अद्यापही प्रलंबित होती. ही रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनाकडून विमा हप्त्याचा वाटा थकित होता.या प्रकरणाची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने या संदर्भात प्रशासकीय पातळीवर आढावा घेऊन प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला होता. वित्त विभागाने त्याला त्वरित मंजुरी देत शासन निर्णय जारी केला.२०२३-२४ या कालावधीतील नुकसानभरपाई मिळालेली नाही, असा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण झाला होता. यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हप्त्याच्या रकमेबाबत आपली देणी तत्काळ मंजूर केली, त्यामुळेच प्रलंबित नुकसानभरपाईचे वाटप आता शक्य झाले आहे.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील, तसेच पुढील पीकहंगामाच्या तयारीसाठी त्यांना मोठा आधार मिळणार आहे.