वर्धेत पावडे चौकातील अतिक्रमणावर गजराज

11 Jul 2025 22:15:57
वर्धा,
Pawde Chowk in Wardha शहरात दुकानदारांनी बाजार परिसरात अतिक्रमण केले होते. तेे अतिक्रमण हटविण्याची कारवाई नगर परिषदेने सुरू केली होती. शहर परिसरात अतिक्रमणामुळे निर्माण होणार्‍या समस्यांमुळे नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानुसार, आज शुक्रवार ११ रोजी नगर परिषद प्रशासनाने पावडे चौकातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. पावडे नर्सिंग चौक परिसरात बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याने नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
 
 
Pawde Chowk in Wardha
 
शहरातील बाजारपेठ परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पायर्‍या बांधल्या होत्या. तसेच, शहराच्या विविध चौकात रस्त्यांवर हातगाड्या आणि इतर व्यावसायिकांनी दुकाने उभारून अतिक्रमण केले आहे. Pawde Chowk in Wardha त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत होता. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने गोल बाजार, पटेल चौक, पत्रावळी चौक, अंबिका चौक, दुर्गा टॉकीज रोड, बजाज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आर्वी नाका परिसरात दुकानदारांनी केलेले अतिक्रमण हटवले होते. यासोबतच हातगाड्यांवर विविध प्रकारची दुकाने उभारणार्‍या लोकांचे अतिक्रमणही हटविण्यात आले. यामुळे रस्ता मोकळा झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, नगर परिषद प्रशासनाला छोट्या व्यावसायिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
 
 
त्यानंतर पावडे चौकातील नागरिकांनी अतिक्रमण काढण्यासाठी निवेदन दिली. अनेकांनी या चौकात अतिक्रमण करून कायमचे छोटे व्यवसाय उभारले होते. Pawde Chowk in Wardha या परिसरात अवैध व्यवसाय सुरू असल्याने दररोज वाद होत होते. या संदर्भात तक्रारीमुळे नगर परिषद प्रशासनाने बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍या हातगाड्यांचे अतिक्रमण हटवले. ही कारवाई नगर परिषदेचे निखील लोहवे, गजानन पेटकर, संदीप पाटील, स्वप्निल खंदारे, राकेश रामटेके यांनी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर आणि शहर पोलिस पथकाच्या मदतीने केली.
Powered By Sangraha 9.0