skin glow प्रत्येक व्यक्तीला आपली त्वचा उजळ, तजेलदार आणि निरोगी दिसावी असे वाटते. मात्र धावपळीच्या जीवनशैलीत, झोपेच्या अभावामुळे, असंतुलित आहार आणि प्रदूषणामुळे त्वचेची चमक हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे त्वचेवर कोरडेपणा, डाग, थकवा आणि निस्तेजपणा दिसून येतो. मात्र स्किन एक्स्पर्ट्सच्या मते, काही साध्या पण नियमित सवयी अंगिकारल्यास त्वचेला नैसर्गिक निखार देता येतो.
“त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फक्त क्रीम किंवा फेसवॉश पुरेसा नाही. बाह्य निगा तर आवश्यक आहेच, पण त्यासोबतच आंतरिक पोषण आणि तणावमुक्त जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची आहे. त्वचेला प्रत्येक पातळीवर काळजी आणि प्रेम देणं गरजेचं आहे.”
त्वचेला नैसर्गिक निखार देण्यासाठी सल्ले –
१. हायड्रेशनवर भर द्या :
पाणी पिणं हे चेहऱ्याची ताजेतवानेपणा वाढवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. दररोज किमान ८-१० ग्लास पाणी प्यावं. पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं आणि त्वचेला आतून फ्रेश ठेवतं. पाण्यात लिंबू आणि काकडीचे तुकडे टाकून डिटॉक्स वॉटरसारखंही वापरता येतं.
२. अँटीऑक्सिडंटयुक्त आहार घ्या :
विटॅमिन C, E आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्सने समृद्ध आहार त्वचेला आतून उजळ बनवतो. फळं, भाज्या, ड्रायफ्रूट्स आणि सीड्स आपल्या रोजच्या आहारात जरूर समाविष्ट करा.
३. सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करा :
UV किरणांमुळे त्वचा काळवंडते, कोरडी होते आणि तिची नैसर्गिक चमक कमी होते. जर तुम्ही बाहेर फिरत असाल, तर दर ३-४ तासांनी सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. घरात राहिल्यास वारंवार लावण्याची गरज नाही.
४. झोप आणि तणाव यांचा त्वचेवर प्रभाव :
झोपेचा अभाव आणि मानसिक तणावामुळे त्वचेवर थकवा, डलनेस आणि डाग दिसू लागतात. दररोज किमान ७-८ तासांची शांत झोप घ्या आणि ध्यान किंवा योगासाठी वेळ द्या.
५. साधा पण नियमित स्किनकेअर रूटीन ठेवा :
स्किन केअर skin glow रूटीन अत्यंत सोपा असावा – चेहरा क्लेंझरने धुवा, त्यानंतर मॉइश्चरायझर लावा आणि शेवटी सनस्क्रीन. टोनर आवश्यक नाही. म्हणजेच, चेहऱ्याचा ग्लो महागड्या ट्रीटमेंटमधून नव्हे, तर अशा लहान पण सातत्यपूर्ण सवयींमधून वाढवता येतो.त्वचा हा आपल्या आरोग्याचा आरसा असतो. त्यामुळे तिची काळजी घेताना केवळ बाह्य सौंदर्य नव्हे तर आंतरिक पोषण, तणावमुक्तता आणि नैसर्गिक सवयींकडेही लक्ष देणं अत्यावश्यक आहे. वर्ल्ड स्किन हेल्थ डेच्या निमित्ताने हे पाच सोपे उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात आणा आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक तेज द्या.