मुंबई,
shefali jariwala टीव्ही अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी झालेल्या अचानक निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्व सुन्न झालं. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी तिच्या जाण्याने दुःख व्यक्त केलं. शेफालीच्या निधनानंतर तिचे पती पराग त्यागी खूपच भावनिक झाले आहेत. ते सतत सोशल मीडियावर शेफालीच्या आठवणी शेअर करत असून, तिच्याविषयीच्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी सहानुभूती व्यक्त करत त्यांना मानसिक आधार दिला आहे. मात्र दुसरीकडे काही ट्रोलर्सनी पराग त्यागींना "अटेंशन सीकर" म्हणत टीका केली आहे.
पराग त्यागींनी नुकतीच शेफालीचा हात हातात घेतलेली एक भावनिक फोटो पोस्ट शेअर केली. त्यावर त्यांनी लिहिलं, "Forever Together" (नेहमीसाठी एकत्र). या पोस्टवर अनेकांनी प्रेम व्यक्त केलं, शेफालीला श्रद्धांजली वाहिली. पण काही जणांनी पराग यांच्यावर वेळेआधी अशा पोस्ट शेअर केल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली.
या shefali jariwala टीकेनंतर पराग त्यागी यांनी ट्रोलर्सना ठाम शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणाले की, काही लोक म्हणतात मी इतक्या लवकर पोस्ट का करतो, पण सगळे लोक तुमच्यासारखे नसतात. परीला म्हणजेच शेफालीला सोशल मीडियावर राहायला खूप आवडत होतं, तिला लोकांचं प्रेम हवं असायचं. मी आधी कधीच सोशल मीडियावर नव्हतो, पण आता ती माझ्या हृदयात आहे. ती जरी इथे नसली तरी तिचं अस्तित्व कायम सोशल मीडियावर असणार आहे. हे अकाउंट तिच्यासाठी समर्पित आहे.मी तिच्या आठवणी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत राहीन. मला नकारात्मक लोकांची काहीही पर्वा नाही. मी त्यांची काळजी करतो ज्यांनी शेफालीला मनापासून प्रेम दिलं, अजूनही देतात आणि नेहमी देतील. मी तिच्या सुंदर आठवणी सर्वांसोबत जपून ठेवणार आहे.पराग त्यागींचं हे उत्तर सोशल मीडियावर चांगलंच गाजत असून, त्यांच्या भावनिक शब्दांनी पुन्हा एकदा चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. शेफालीच्या आठवणींना त्यांनी ज्या प्रकारे सन्मान दिला, त्यातून त्यांच्या नात्याचं खरं प्रेम दिसून येतं.शेफाली जरीवालाच्या निधनानंतर ट्रोलर्सवर भडकले पती पराग त्यागी; म्हणाले, “ती आता माझ्या हृदयात आहे”