कंगनाचा दिलजीतवर हल्लाबोल

11 Jul 2025 14:07:34
मुंबई,
Kangana Ranaut बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत ही अनेकदा विविध विषयांवर मत व्यक्त करत चर्चेत येत असते. अलीकडे ‘सरदार जी ३’ चित्रपटातील पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केल्यामुळे पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांझवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर कंगनानेही दिलजीतवर टीका करत आपली भूमिका मांडली आहे.
 

Kangana Ranaut statement on Diljit Dosanjh 
कंगनाचा थेट सवाल : अजेंडा काय आहे?
'क्वीन' फेम अभिनेत्री कंगना राणौत हिने दिलजीत दोसांझच्या हानिया आमिरसोबत काम करण्यावरून नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, "मी या लोकांबद्दल आधीही खूप काही बोलले आहे. राष्ट्र उभारणीची भावना आपल्यात असावी लागते. प्रत्येकाने त्यात सहभाग घेतला पाहिजे. मग दिलजीत स्वतःचा वेगळा मार्ग का शोधतोय? क्रिकेटपटू वेगळी दिशा का निवडतोय?"
कंगना पुढे Kangana Ranaut म्हणाली, “गरीब सैनिक, गरीब राजकारणी राष्ट्रासाठी झटतोय. मग काही सेलिब्रिटींचा स्वतःचा अजेंडा का असावा? हे अनैसर्गिक आहे असं मी म्हणत नाही, पण आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण ही भूमिका राजकारण्यांसमोर ठामपणे मांडू.”२२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. याच दरम्यान ‘सरदार जी ३’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, ज्यात दिलजीत दोसांझसोबत पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर दिसली. यामुळे या चित्रपटावर टीकेची झोड उठली.त्यामुळे ‘सरदार जी ३’ भारतात प्रदर्शित झाला नाही. शिवाय फवाद खान, माहिरा खान, अली झफर, आतिफ असलम, राहत फतेह अली खान यांच्यासह हानिया आमिर यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
सध्याच्या परिस्थितीत कंगनाने पुन्हा एकदा आपली स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडून दिलजीतवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचा संदेश देत तिने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. त्यामुळे ‘सरदार जी ३’ चित्रपटावरील वाद आणखी गहिरा होण्याची चिन्हं आहेत.
Powered By Sangraha 9.0