नागपूर,
murdering father वडिलाेपार्जित संपत्तीच्या विक्रीतून आलेल्या पैशाच्या वाटणीवरुन मुलाने वडिलांशी वाद घातला. त्यानंतर वडिलांच्या डाेक्यात लाेखंडी राॅड घालून खून केला. या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश-2 च्या न्यायालयाने वडिलाच्या हत्याकांडात दाेषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने 10,000 रुपयांचाही दंड ठाेठावला असून दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास शिक्षा सुनावली आहे. शेख युनूस शेख युनूस (50), भालदारपुरा, माेहम्मद अली चाैक असे खुनी मुलाचे नाव आहे. मृताचे नाव शेख युनूस मेहबूब शरीफ (70) असे हाेते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 24 फेब्रुवारी 2021 राेजी घडली. युनूसचा त्याच्या कुटुंबाशी त्याच्या वडिलाेपार्जित मालमत्ता विकल्यानंतर मिळालेल्या पैशावरून वाद झाल्याचा आराेप हाेता. घटनेच्या दिवशी सकाळी 11.30 वाजता पुन्हा एकदा भांडण सुरू झाले. रागाच्या भरात युनूसने त्याचे वडील युनूस यांच्या डाेक्यावर लाेखंडी राॅडने हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी केले. जखमी युनूसला मेयाे रुग्णालयात आणण्यात आले. डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. पाेलिसांनी युनूसविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्याच दिवशी त्याला अटक केली. दाेन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने युनूसला त्याच्या वडिलांच्या हत्याकांडात दाेषी ठरविण्यात आले. न्यायालयाने शेख युनूसला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गणेशपेठचे पीएसआय मयुरेश शिंदे यांनी न्यायालयात आराेपपत्रब दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने अॅड. ठाकरे यांनी युक्तिवाद केला आणि बचाव पक्षाच्या वतीने अॅड. सुदामे यांनी युक्तिवाद केला. पाेलिस अधिकारी सचिन इप्पार आणि अभिमन्यू भुरे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.