पुणे,
Prasad Tamdar राज्यात यापूर्वीही अनेक भोंदूबाबांवर कारवाई झाली असूनही, अशा तथाकथित बाबांची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये. सध्या पुण्यातील मुळशी तालुक्यातील सुस गावात असलेल्या ‘स्वामी समर्थ बिल्डिंग’मध्ये राहत असलेल्या प्रसाद तामदार या भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रसाद तामदार नावाचा हा बाबा स्वतःला ‘दिव्य शक्ती प्राप्त’ झालेला सिद्ध करत होता. त्याचा मठ महिलांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला होता. मात्र आता या बाबाचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, महिलांसोबत अश्लील वर्तन, विचित्र डान्स आणि ओटी भरण्याचे दृश्य पाहून समाज सुन्न झाला आहे.
पोलीस तपासात बाबाच्या लॅपटॉपमधून महिलांचे व पुरुष भक्तांचे अश्लील व्हिडीओ, पॉर्न फोल्डर आणि अनैसर्गिक कृत्यांचे पुरावे सापडले आहेत. इतकेच नव्हे, तर तो भक्तांना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर मानसिक प्रभाव टाकत असे आणि काही तरुणांशी अनैसर्गिक संबंध ठेवत असल्याचंही निष्पन्न झालं आहे.
पोलीस Prasad Tamdar तपासादरम्यान बाबाने अनेक तरुणांची फसवणूक केल्याची कबुली मिळाली असून, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो येरवडा तुरुंगात आहे आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.या प्रकरणामुळे पुन्हा एकदा अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचा इशारा समाजाला मिळाला आहे. अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत भक्तांना लुबाडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.