विहिरीत विषारी वायूने गुदमरून इसमाचा मृत्यू

13 Jul 2025 21:45:58
तभा वृत्तसेवा
भंडारा,
Bhandara News : मोटारपंप दुरूस्तीकरिता विहिरीत उतरलेल्या 45 वर्षीय इसमाचा विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाला. छगन डोकीफोडे रा. पालांदूर असे मृतकाचे नाव आहे. सदर घटना लाखांदूर तालुक्यातील पालांदूर शेतशिवारात आज 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
 
 
JMLK
 
शेतकरी छगन रामकृष्ण डोेकीफोडे हे पहाटे 6 वाजताच्या सुमारास मोटर दुरूस्तीच्या कामासाठी शेतमालकाचे अंतराम गायधनी यांच्या शेतात गेले होते. यावेळी ते विहिरीत उतरले असता तेथील विषारी वायूने गुदमरून ते पाण्यात पडले व यातच त्यांचा मृत्यू झाला.
 
 
घटनेची माहिती प्रशासनाला होताच तहसीलदार धनंजय देशमुख, पालांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार बन्सोड यांच्या उपस्थितीत भंडारा अग्निशमन विभागाचे समीर गणवीर, अग्निशमन अधिकारी यांचे नेतृत्वात डीसीओ रवी, अमित, विलास, प्रणय यांनी बचाव कार्यात सहभाग घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
Powered By Sangraha 9.0