वर्धा,
Wardha-Crop Insurance Registration : शेतकर्यांचे नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाल्यास पीकविमा आधार देणारा ठरतो. यावर्षीपासून सरकारने १ रुपयात पीकविम्याला थांबा देत पीक विमा योजना नवीन स्वरूपात सुरू केली आहे. पण आतापर्यंत केवळ ८८० शेतकर्यांनीच पिकांना विम्याचे कवच दिल्याचे वास्तव आहे.
मागीलवर्षी १ रुपयात पीकविम्याचा लाभ शेतकर्यांना घेता आला. यंदा सरकारने नवीन पीक विमा योजना लागू केली. ज्यामध्ये शेतकर्यांना आता प्रचलित दराने विमा प्रीमियम भरावा लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८८० शेतकर्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. नवीन योजने अंतर्गत पीक विमा फत पीक कापणी प्रयोगाच्या आधारे उपलब्ध होईल. दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जाणार नाही. या योजनेद्वारे विमा कंपन्यांचे खिसे भरण्याचे धोरण असल्याचे शेतकर्यांच्या लक्षात आल्याने त्याला नाममात्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पीक विम्यात सहभागी होण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.
नुकसानीचे मुल्यांकन कापणी प्रयोगाच्या आधारे
आता शेतकर्यांना हेटरी आधारावर विमा प्रीमियम भरावा लागेल. कापसासाठी प्रति हेटर ९००, सोयाबीनसाठी प्रति हेटर ११६० असा प्रीमियम भरावा लागेल. तसेच नुकसानीचे मूल्यांकन फत कापणी प्रयोगाच्या आधारे केले जाईल. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकर्यांसाठी पीकविमा ऐच्छिक आहे. भाड्याने घेतलेल्या जमिनीवर शेती करणार्या शेतकर्यांनी पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे बंधनकारक आहे. या योजने अंतर्गत शेतकर्यांना भरावा लागणारा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टके, रबी हंगामासाठी १.५ टके आणि खरीप आणि रबी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टके निश्चित करण्यात आला आहे. तसेच पीकविम्यात सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी व ई-पीक पाहणी क्रमप्राप्त राहणार आहे.