तभा वृत्तसेवा
ब्रम्हपुरी,
The flood came मागील आठवड्यात ब्रम्हपुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगेला पूर आला. पुरामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर मात्र पावसाने डोळे वटारले असून, कडक उन्हं तापत असल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे उरले-सुरले पर्हेही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने रोवणी कशी करावी, या चिंतेत शेतकरी सापडला आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातून वाहणारी वैनगंगा नदी दुधडी भरून वाहू लागली व परिसरातील सखल भागातील हजारो एकर शेतजमिन पाण्याखाली आली. The flood came चार दिवस पिक पाण्याखाली होते. पुरासोबत शेतात वाहून आलेला गाळ पर्हे, आवते धान पिक व भाजीपाला पिकांवर बसला. गाळ निघल्यानंतर उरलेले पिक चांगले व्हावे यासाठी पावसाची आवश्यकता होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. तसेच पुरामुळे वाहत आलेल्या चिखल व वाळूमुळे रस्ते चालण्या योग्य राहिले नाहीत. पूर ओसरल्यानंतरही समस्या कायम आहे.
गोसेखुर्द धरणाच्या निर्मितीनंतर ब्रह्मपुरी तालुक्यात शेतीचे हे चित्र नेहमीचे झाले आहे. पुरामुळे शेतीचे बांध, बंधारे फुटतात. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर शेतात नावालाही पाणी शिल्लक राहत नाही. The flood came पावसाळ्यात गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे दरवर्षी एक-दोनदा पूर येऊन शेतीचे नुकसान होत असल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. उन्हाळ्यात मात्र नदी कोरडी राहते. त्यामुळे नदी काठावरील शेतातील विहिरी कोरड्या पडतात. अनेक गावांच्या नदी तिरावरील विहिरीतील पाणी पातळी घटून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. जिवनदायिनी म्हणून पूर्वापार प्रसिध्द असलेल्या वैनगंगा नदीवर गोसेखुर्द धरण झाल्यानंतर परिसरातील शेतकरीबांधव सुखी होईल, अशी अपेक्षा असताना दरवर्षी नुकसान होत असल्याने शेतकर्यांच्या पदरी मात्र निराशाच असल्याचे चित्र दिसून येत आहे.