राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

15 दिवसांत 7 पेक्षा जास्त अपघात

    दिनांक :15-Jul-2025
Total Views |
अमोल सांगानी
 
राळेगाव,
national highways नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 44 वर अपघात मालिका सुरूच असून या विविध अपघातांमध्ये 15 दिवसांत 7 पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले आहेत. वाढत्या अपघातांमुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यातही वडकी ते करंजी दरम्यान खूप अपघात होत असल्यामुळे महामार्ग कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूर ते हैदराबाद हा रस्ता नव्याने बनवण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांचा वेग वाढला आहे. गुळगुळीत रस्त्यामुळे वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत.
 
 
highways
 
1 जुलैला या महामार्गावर सोनुर्ली फाट्याजवळ एका टिप्पर व कंटेनरचा अपघात झाला. यात चालक गंभीर जखमी होऊन त्याला नागपूरला हलवावे लागले. national highways 7 जुलैला वडकी उड्डाणपुलावर भरधाव कारची दुभाजकाला धडक बसून चालक गंभीर जखमी झाला. पाचच दिवसांनी झुल्लरच्या युवकाला महामार्ग ओलांडताना ट्रकने उडवले. यावेळी त्याच्या एका पायावरून ट्रकचे चाक जाऊन त्याच्या पायाचा चेंदामेंदा झाला.
 
 
रविवार, 13 जुलैला महामार्गावर जणू अपघातमालाच झाली. पहाटे तेलंगणातील टमाटे घेऊन येणारा ट्रक महामार्गावरील किन्ही फाट्यासमोर पलटला. national highways या अपघातात चालक व वाहक गंभीर जखमी झाले व शेतकèयांच्या टमाट्यांचे मोठे नुकसान झाले. सकाळी 11 वाजता महामार्गाच्या कामावरील क्रेनने टमाटे घेऊन जाणाèया दुसèया ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले व वाहतूक दोन तास ठप्प झाली. संध्याकाळी महामार्गालगत स्पीड ब्रेकरवरून दुचाकी उसळून अपघात झाला. यामध्ये चालकाचे डोके व हाता-पायाला मार लागून तो गंभीर जखमी झाला. तर रात्री 12 वाजता वडकी पेट्रोल पंपासमोरच्या पुलाजवळ महामार्गाच्या चुकीच्या फलकामुळे एका दुचाकी चालकाचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झाला.
 
 
या वाढत्या अपघात मालिकेमुळे सर्वच वाहन चालकांसह, गंभीर म्हणजे पोलिसही चिंताग्रस्त झाले आहेत. एक घटना संपत नाही तर दुसरी घटना घडत आहे. national highways अपघाताच्या भीतीमुळे वाहनचालकांना या रस्त्यावर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांमुळे वाहनचालक, प्रवासी, प्रशासन, पोलिस सारेच हैराण झाले आहेत. वाढत्या अपघातांना आवर घालण्यासाठी पोलिस, आरटीओ व टोल कंपनी काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कंपनीच्या हलगर्जीपणा
या महामार्गावर रविवारी क्रेन व ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही क्रेन महामार्गाच्या कामावर आहे. क्रेन चालकाच्या हलगर्जीपणाने हा अपघात घडला असून यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. national highways ही दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध होती. त्यामुळे महामार्ग वाहतूक दोन तास ठप्प होऊन दोन्हीकडे वाहनाच्या रांगाच रांगा होत्या.
 
 
यावेळी समस्त वाहनचालकांनी महामार्ग अधिकारी व कर्मचाèयांबाबत संताप व्यक्त केला. महामार्ग सुरक्षेची जबाबदारी टोलचालकावर आहे. यासाठी महामार्ग कंपनी व सुरक्षा अधिकारीसुद्धा आहेत. मात्र या कंपनीकडून वाहनचालक सुरक्षेची कुठलीच काळजी घेतली जात नाही. national highways वाहनांकडून टोलवसुली करण्यातच ही कंपनी धन्यता मानत असल्याचे वाहन चालकांनी सांगितले. अखेर पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे अशा मुजोर महामार्ग अधिकारी व कर्मचाèयांवर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करावी, अशी अपेक्षा आहे.