बँकॉक,
Sex scandal at Thailand's थायलंडमधील बौद्ध धर्माचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मठांवर एक गंभीर आणि धक्कादायक घोटाळा उजेडात आला आहे. देशाच्या धार्मिक प्रतिष्ठेला हादरवणाऱ्या या प्रकरणात एका महिलेने वरिष्ठ बौद्ध भिक्षूंना लैंगिक जाळ्यात अडकवून, नंतर त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करत ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे थायलंडमधील बौद्ध समाजात प्रचंड संताप आणि निराशा पसरली आहे. थायलंड पोलिसांनी ३५ वर्षीय विलावन अम्सावत या महिलेला राजधानी बँकॉकच्या नोंथाबुरी प्रांतातून अटक केली. तिच्यावर खंडणी, मनी लाँड्रिंग आणि चोरीची मालमत्ता मिळवणे यांसारख्या गंभीर आरोपांची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, विलावनने देशातील अनेक वरिष्ठ भिक्षूंना आपल्या मोहजालात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने गुप्त रेकॉर्डिंग, छायाचित्रे आणि मेसेजेसच्या आधारे त्यांना धमकावले आणि मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. बौद्ध धर्मात ब्रह्मचर्याचे पालन अनिवार्य असून, Sex scandal at Thailand's भिक्षूंनी लैंगिक संबंध ठेवणे हा गंभीर धार्मिक अपवाद मानला जातो. पण या घोटाळ्यात उघडकीस आले की अनेक भिक्षूंनी हा संकल्प मोडला आणि त्याचाच वापर करून विलावनने त्यांना आपल्या नियंत्रणात घेतले. आतापर्यंत किमान ९ भिक्षूंना त्यांच्या पदांवरून हटवण्यात आले असून, आणखी अनेकांच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. विलावनच्या बँक खात्यांची तपासणी केली असता, गेल्या तीन वर्षांत तिच्या खात्यात तब्बल ११.९ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स म्हणजेच सुमारे ₹९९ कोटींचा निधी जमा झाल्याचे आढळले.
या पैशांचा मोठा हिस्सा ऑनलाइन जुगार वेबसाइट्सवर खर्च झाला होता. एका प्रकरणात, थायलंडच्या उत्तरेकडील प्रसिद्ध बौद्ध मंदिरातील वरिष्ठ भिक्षूने तिच्या खात्यात थेट मोठी रक्कम वर्ग केल्याचेही पुरावे समोर आले आहेत. बँकॉकमधील एक प्रमुख बौद्ध मंदिराचा मुख्य भिक्षू अचानक राजीनामा देतो, त्यानंतर 'सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'ला संशय येतो आणि या साखळीचा तपास सुरू होतो. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, Sex scandal at Thailand's या प्रकरणामागे एक पद्धतशीर आणि नियोजित गुन्हेगारी रॅकेट होते, ज्यामध्ये धार्मिक वर्चस्वाचा गैरवापर केला गेला. सध्या विलावन पोलीस कोठडीत असून तिने अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र, अटकेपूर्वी एका मुलाखतीत तिने एका भिक्षूसोबत संबंध असल्याचे कबूल केले आणि त्याला पैसे दिल्याचेही म्हटले ज्यामुळे अनेक अनुत्तरित प्रश्न समोर येत आहेत. हा प्रकरण थायलंडमध्ये धार्मिक आस्थेवर गदा आणणारे आणि बौद्ध मठांमधील आंतरिक शिस्त आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे. देशभरातील नागरिक आणि श्रद्धाळू यामुळे व्यथित असून, सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे.