भविष्याचा विचार करुन विद्यार्थ्यांनी योग्य शाखेची निवड करावी

17 Jul 2025 21:23:57
नागपूर,
shriram-sonawane : अभियांत्रिकीच्या पदवीपूर्व प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, विद्यार्थी आणि पालक आता योग्य शाखेची निवड करण्यात व्यस्त आहे. नेमकी कोणती शाखा घ्यावी? या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत आहे. एकीकडे नामांकित खासगी महाविद्यालयांमध्ये लाखो विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा लागली आहे.तर दुसरीकडे अभियांत्रिकीच्या शाखेची योग्य निवड करीत असताना भविष्यातील संधीचा सुध्दा विचार करावा, असे आवाहन प्रा. डॉ. श्रीराम एस. सोनवणे यांनी केले आहे.
 
 
SHRIRAM
 
 
 
योग्य अभियांत्रिकी शाखेची निवड झाल्यास भविष्याची ठरविण्यात मदत होत असते. तंत्रज्ञानातील बदलांमुळे आता विद्यार्थ्यांना आपली आवड, विविध उद्योगातील गरज, तसेच शैक्षणिक क्षमता आदींचा विचार करणे आवश्यक झाले आहे. मुख्यत: चांगल्या पगाराच्या संधी पाहून अनेक विद्यार्थी शाखेची निवड करीत आहे. नोकरी मिळवण्यासोबतच एक चांगला अभियंता व्हायचे आहे, हे विद्यार्थ्यांनी ठरविले पाहिजेत. पालकांनी सुध्दा याकडे अधिक लक्ष गरज आहे. केमिकल इंजिनीअरिंगसह इतर शाखेत बहुपर्यायी आणि भविष्यकालीन शाखा उपलब्ध आहे. बहुतेक विद्यार्थ्यांचे लक्ष संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखांकडे असते, परंतु केमिकल इंजिनीअरिंग या शाखेत सुध्दा अनेक संधी आहे. पेट्रोकेमिकल्स आणि ऊर्जा, औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान अन्न प्रक्रिया आणि पर्यावरण तंत्रज्ञान नॅनोतंत्रज्ञान आदींमध्ये अनेक चांगल्या संधी आहे. विशेषत: भविष्यातील आवश्यकतेचा विचार निर्णय घ्यावा, असेही सोनवणे यांनी स्पष्ट सांगितले.
Powered By Sangraha 9.0