राजस्थान,
Rare Earth Minerals राजस्थानमधील बालोतरा आणि जालोर या दोन जिल्ह्यांमध्ये दुर्मिळ खनिजांचा साठा सापडल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या भागाकडे वळले आहे. इलेक्ट्रिक वाहनं, विंड टर्बाईन, स्मार्टफोन आणि लष्करी उपकरणांसाठी अत्यावश्यक असणारी ही खनिजं आतापर्यंत चीनच्या मक्तेदारीत होती. मात्र आता भारताने या क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, जागतिक बाजारात आपली छाप उमठवण्याची संधी निर्माण झाली आहे.
जिओलॉजिकल Rare Earth Minerals सर्वे ऑफ इंडिया (GSI) आणि अणू खनिज संचालनालयाने (AMD) बालोतरा आणि जालोर भागात सर्वेक्षण करून या दुर्मिळ खनिजांचा शोध लावला आहे. भाटी खेडा या भागातील उत्खनन लवकरच सुरू होणार असून, येथील साठ्याची किंमत जवळपास १० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.या ठिकाणी बास्टनासाइट, ब्रिथोलाइट आणि जेनोटाइम सारख्या महत्त्वपूर्ण खनिजांचा साठा आहे. ही खनिजं कार्बोनेटाइट आणि माइक्रोग्रेनाइट टेकड्यांमध्ये सापडली आहेत. यामुळे भारताला तंत्रज्ञान व संरक्षण क्षेत्रात मोठा फायदा होणार आहे. चीनने या खनिजांची निर्यात थांबवल्यानंतर जगभरात त्याचे परिणाम जाणवले होते. मात्र आता भारतातच या खनिजांचा साठा मिळाल्याने चीनला जबर झटका बसला आहे.
भाटी खेडा Rare Earth Minerals हे क्षेत्र वन्यजीव किंवा संरक्षित क्षेत्रात न येत असल्याने उत्खननासाठी कोणतीही अडचण येणार नाही. लवकरच या साईटच्या उत्खननासाठी पर्यावरणीय मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. लिलाव प्रक्रियेत सरकारी तसेच खासगी कंपन्या सहभागी होणार असून, या खजिन्याचा भारताच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे.दुर्मिळ खनिजांच्या साठ्यामुळे भारताला जागतिक बाजारात स्वबळावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. चीनकडून निर्माण झालेल्या जागतिक दडपणाला उत्तर देताना, भारताने हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याचे दिसून येत आहे.