'ते अजूनही पती-पत्नी आहेत, काहीही गंभीर घडलेलं नाही'

फरदीन-नताशा घटस्फोटावर मुमताज यांचे मत

    दिनांक :02-Jul-2025
Total Views |
मुंबई 
Fardeen Khan divorce बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिवंगत फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांची मुलगी नताशा माधवानी यांचा विवाह डिसेंबर २००५ मध्ये झाला होता. सुरुवातीला हे दांपत्य सुखी आयुष्य जगत होते, मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. २०२३ च्या मध्यात बातम्या आल्या की फरदीन आणि नताशा एक वर्षापेक्षा जास्त काळ वेगळं राहत आहेत आणि घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत.
 
 

Fardeen Khan divorce
 
 
 
या Fardeen Khan divorce  पार्श्वभूमीवर नताशाची आई, मुमताज यांनी एका मुलाखतीत या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "दोघं वेगळं राहत असले तरी अजूनही त्यांचा घटस्फोट झालेला नाही. मला फरदीन खूप आवडतो, तो माझ्या डोळ्यासमोर मोठा झालाय. तो अजूनही आमचा सन्मान राखतो. नताशा आणि फरदीन अजूनही पती-पत्नी आहेत."त्यानंतर मुमताज यांनी त्यांच्या नात्यातील दुराव्याबाबत सांगितले की, "काहीही गंभीर घडलेलं नाही. कदाचित ते आता एकत्र राहत नाहीत, पण प्रत्येक लग्नात चढ-उतार येतात. ते आता खूप मोठे झाले आहेत, माझं ऐकत नाहीत. कधी कधी लोक एकमेकांसोबत राहू शकत नाहीत, वाद होतात."
 
 
 
‘मुलांमुळे Fardeen Khan divorce  ते वेगळं होणार नाहीत’, असं सांगत मुमताज म्हणाल्या, "नताशा आणि फरदीनने घटस्फोट घेऊ नये कारण त्यांना मुले आहेत. फरदीन हा एक चांगला वडील आहे. तो आपल्या शूटिंगचं वेळापत्रक मुलांच्या गरजेनुसार बदलतो. जरी ते घटस्फोट घेतील, तरी ते त्यांच्या मुलांमुळे कायम संपर्कात राहतील."या वक्तव्यानंतर हे स्पष्ट होते की, मुमताज या दांपत्यातील नातं टिकावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि फरदीनवर त्यांचा अजूनही पूर्ण विश्वास आहे.