वाहनधारकांच्या घाईमुळे फिटमेंट सेंटरवर उडताेय गाेंधळ

अनेकांना 150 रुपयांचा भुर्दंड

    दिनांक :02-Jul-2025
Total Views |
नागपूर,
High Security Registration Plate उच्च सुरक्षा नाेंदणी प्लेट (एचएसआरपी) ऑनलाईन नाेंदणी केलेल्या वाहनधारकांची नंबर प्लेट फिटमेंट सेंटरवर माेठी गर्दी उसळत आहेत. वाहनधारक नंबर प्लेट बसविण्यासाठी घाई करीत असल्यामुळे माेठा गाेंधळ उडत आहे. दंडात्मक कारवाईपासून सुटका व्हावी म्हणून ऑनलाईन नाेंदणी झपाट्याने वाढत आहे.
 
 

High Security Registration 
राज्यातील जवळपास दाेन काेटी 10 लाख वाहने असून त्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नाेंदणी प्लेट (एचएसआरपी) लावणे बंधनकारक करण्यात आले. ऑनलाईन नाेंदणी करुन एचएसआरपी प्लेट लावायची आहे. आतापर्यंत तीनदा तारीख वाढविल्यानंतर शासनाने 15 ऑगस्ट ही नवीन नंबर प्लेटची नाेंदणी करण्याची शेवटची मुदत दिली आहे. त्यानंतर ज्यांच्या वाहनावर उच्च सुरक्षा नाेंदणी प्लेट नसेल अशा वाहनांवर 2 ते 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही मुदत वाढल्यानंतर ऑनलाईन नाेंदणी करणाऱ्यांचा टक्का वाढला. फि टमेंटवर जाऊन नंबर प्लेट लावणाऱ्यांची गर्दी सध्या वाढत आहे.
 
 
त्यामुळे High Security Registration Plate चार स्लाॅटमध्ये वाहनांवर नवी नंबर प्लेट लावण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र, शहरात फक्त 100 फिटमेंट सेंटर असल्यामुळे तेथे वाहनधारकांची संख्या माेठी असल्यामुळे गर्दी हाेत आहे. फिटमेंट करण्यासाठी नियाेजित वेळेवर वाहनधारक गेल्यानंतर फिटमेंट सेंटर संचालकांसाेबत वादाच्या घटना घडत आहेत. दाेन तासांच्या अंतरावर असलेल्या स्लाॅटमध्ये गाड्यांची संख्या लक्षात घेता वेळेत काम हाेत नाही. त्यामुळे वाहनधारक आणि फिटमेंट सेंटर संचालकांमध्ये खटके उडत आहेत. काही वाहनधारक नियाेजित वेळ आणि नियमांवर बाेट ठेवून वाद घालून खाेळंबा करीत आहेत. त्यामुळे अनेक फिटमेंट सेंटरवर वाहनधारकांच्या घाईमुळे गाेंधळ निर्माण हाेत असल्याचे चित्र शहरात आहे.
 
 
फिटमेंट केंद्रावर 150 रुपयांची वसुली
 
 
फिटमेंटसाठी ऑनलाईन भरलेल्या शुल्काव्यतिरिक्त िफटेमेट सेंटरवर अतिरिक्त 150 रुपये घेण्यात येतात. नंबर प्लेटला वेगळी सुरक्षा पट्टी लावण्याच्या नावाखाली 150 रुपये घेण्यात येतात. मात्र, ती पट्टी लावणे अनिवार्य नसूनही अनेकांना ती पट्टी लावण्यासाठी बाध्य केल्या जात असल्याची चर्चा आहे.


आतापर्यंतची एचएसआरपीची आकडेवारी
 
एमएच 49 (पूर्व) एमएच 31 (शहर)
नाेंदणी - 1,23132 1,25,934
अपाॅईंटमेंट - 83291 74,183
फिटमेंट पूर्ण - 66035 59042
 
 
ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर फिटमेंट सेंटरवर काेणत्याही प्रकारचे शुल्क देण्याची गरज नाही. जर कुणी फिटमेंट संटरचा संचालक पैशाची मागणी करीत असेल तर प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी तक्रार करावी.
- किरण बिडकर (प्रादेशिक परिवहन अधिकारी)