माहिती फलक न लावताच पारवा येथे सभागृहाचे बांधकाम

02 Jul 2025 21:34:29
तभा वृत्तसेवा
पारवा, 
Parva-Construction of Auditorium : घाटंजी तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्र संबोधल्या जाणाèया पेसा अंतर्गत गाव पारवा येथे ग्रामपंचायत आवारात सभागृहाचे बांधकाम सुरू असून त्या संदर्भातील माहितीचा फलक लावण्यात आलेला नसल्यामुळे जनतेला नेमकी माहिती मिळत नाही आहे.
 
 
 
y2July-Sabhagruha
 
 
 
हे बांधकाम, हे सभागृह कोणत्या योजनेतून आहे, त्यासाठी किती रुपयांचा निधी उपलब्ध आहे, ही माहिती जनतेला व्हावी, यासाठी बांधकाम सुरू करण्यापूर्वी दर्शनी भागात माहिती फलक लावणे अनिवार्य आहे. मात्र कंत्राटदार मनमानी काम करत असून या सभागृहाच्या बांधकामाबाबत ग्रामस्थ संभ्रमात आहेत.
 
 
 
अशा कुठल्याही प्रकारच्या कामाची माहिती जनतेला देणे ही कायदेशीर तरतूद आहे. मात्र कंत्राटदार आणि संबंधित विभागाचे अधिकारी संगनमत करून कामे करीत असतात. यामुळे काम कोणत्या योजनेतून आहे व कामासाठी किती निधी आहे, ही माहिती जनतेला होऊ नये यासाठी फलक लावले जात नाही का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
 
 
याकडे संबंधीत विभागाने लक्ष देऊन माहितीचे फलक लावावे, अशी मागणी आहे. याबाबत पारवा ग्रामपंचायत सदस्य बालाजी पोटपेल्लीवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कंत्राटदाराने बांधकाम सुरू करण्यापूर्वी दर्शनी भागात फलक लावणे गरजेचे आहे, मात्र कंत्राटदार व अधिकारी दुर्लक्ष करीत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
Powered By Sangraha 9.0