प्रेरणा संस्थेच्यावतीने अनाथ बालकांना शिष्यवृत्ती

02 Jul 2025 21:31:11
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
Prerna Sanstha : प्रेरणा संस्थेच्या वतीने सहा वर्षांपासून अनाथ बालकांना शिष्यवृत्ती दिल्या जाते. ज्या बालकांचे आईवडीलांचे छत्र हरवले आहे, ज्यांना आधाराची गरज असते, अशा बालकांना डॉ. विष्णू उकंडे हे प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शिष्यवृत्ती वाटप करत असतात.
 
 
klk
 
समाजातील अशा दुर्दैवी व अनाथ बालकांना मदत करण्याची अत्यंत आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन डॉ. उकंडे यांनी त्यांना मदत करायचे ठरवले असून ते दरवर्षी मुलांना शिष्यवृत्ती तर देतातच, पण दिवाळीसुद्धा त्यांच्यासोबत साजरी करतात, त्यांना शिक्षणासाठी मदत करतात.
 
 
त्याच अनुषंगाने त्यांनी आर्णीच्या शासकीय विश्रामगृहात अनाथ बालकांना शिष्यवृत्ती देऊन शुभारंभ केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, राजेंद्र जाधव, प्रिया शिंदे, प्रमोद कुदळे, रवी राठोड, निलेश गावंडे, श्याम ठाकरे, अश्विन जाधव, दिलीप नागापुरे, गौरव बोरकर, विनय राठोड, राजेश राठोड, राजू राठोड, दादाराव नांदे, मारोती राठोड, मनोज माघाडे, संध्या मुनेश्वर, लता बुचके तथा इतर मान्यवर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0