२१ महाराष्ट्र बटालियनच्या प्रा. शेळके यांनी केले माउंट फ्रेंडशिप शिखर सर

    दिनांक :02-Jul-2025
Total Views |
पुलगाव,
Prof. Shelke २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वर्धा अंतर्गत येणार्‍या इंडियन मिलिटरी स्कूल, पुलगाव येथील एनसीसी युनिटचे सीटीओ प्रा. प्रवीण शेळके यांनी हिमालय पर्वतातील माउंट फ्रेंडशिप हे बर्फाच्छादित शिखर ज्याची उंची ५२८९ मीटर (१७३५२ फूट) उणे १० तापमानात यशस्वीरित्या सर केले.
 
 

prof. shelke 
 
 
या मोहिमेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी झाला होता. सोलंग व्हॅली मनाली येथुन सुरुवात झालेल्या या मोहिमेत प्रा. शेळके यांनी आलोक आडे, अनिकेत खोब्रागडे व श्रेयस पोहनकर या तीन आजी माजी विद्यार्थ्यांसह भाग घेतला होता. या मोहिमेमध्ये उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, केरळ राज्यातील अन्य पाच जणांनी सहभाग नोंदविला. सतत तीन दिवस पडलेला पाऊस व अतिशय खराब वातावरण असूनही बेस कॅम्प, कॅम्प वन, समीट कॅम्प असे कॅम्प लावत माउंट फ्रेंडशिप हे खडतर शिखर करण्याकरिता तब्बल ५ पाच दिवस लागले. या मोहिमेला इंडियन माउंटेनिरिंग फाउंडेशन दिल्लीची मान्यता प्राप्त झालेली होती. प्रा. शेळके यांनी याआधी माउंट चंद्रभागा १४, माउंट युनम असे ६००० मीटरच्या वर उंची असलेले शिखर सर केलेले आहेत. प्रा. शेळके आपला शिक्षकीपेशा सांभाळीत विद्यार्थ्यांना साहसी उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सतत प्रेरणा देत असतात. यावेळी सुद्धा त्यांनी अनिकेत खोब्रागडे जो सध्या यवतमाळ पोलिस दलात कार्यरत आहे. या माजी विद्यार्थ्यासह शिखर सर केले. या मोहिमेमध्ये इतर सहभागी विद्यार्थ्यांमध्ये दहावीमध्ये शिकणारा आलोक आडे याने ५००० मीटर तर श्रेयस पोहनकर याने ४८०० मीटर पर्यंत मजल मारली.Prof. Shelke या मोहिमला वर्धा जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री राऊत, वर्धा एनसीसीचे कमांडंट सम्यक घोष, अ‍ॅडम ऑफिसर नवनीत थापा यांनी शुभेच्या दिल्याा. मोहीम यशस्वी झाल्याबद्दल इंडियन मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष मनोज भेंडे, सचिव कृष्णा कडू, कमांडंट के. एच. पाटील, प्राचार्य रविकिरण भोजने, पर्यवेक्षक नितीन कोठे आदींनी अभिनंदन
केले.