मुंबई,
Hera Pheri 3 बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय विनोदी त्रिकुट – अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत बहुप्रतिक्षित चित्रपट 'हेरा फेरी ३' मध्ये. प्रियदर्शन दिग्दर्शित या कल्ट कॉमेडी मालिकेच्या तिसऱ्या भागाने अनेक अडचणींवर मात करत आता पुन्हा ट्रॅक पकडला आहे.
काही काळापूर्वी परेश रावल यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये निराशा पसरली होती. त्यानंतर अक्षय कुमारच्या कंपनीने परेश यांच्याविरोधात तब्बल २५ कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. मात्र आता सर्व वाद मिटले असून परेश रावल पुन्हा या चित्रपटात परतले आहेत.शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनानंतर, सुनील शेट्टी यांनी 'हेरा फेरी ३' मधील परेश रावल यांच्या पुनरागमनावर आनंद व्यक्त केला. ते विनोदाने म्हणाले,"मी असेही ऐकत आहे की फाइन-ट्यूनिंग झाले आहे. आता मी रिलीज झाल्यानंतरच बोलेन, त्यापूर्वी मी हेरा फेरीबद्दल बोलणार नाही."
कुटुंबासोबत पाहू शकता
चित्रपटाच्या Hera Pheri 3 आत्म्याबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाले की,"'हेरा फेरी ३' हा एक कौटुंबिक विनोदी चित्रपट असेल, जो प्रेक्षकांना खळखळून हसवेल. पहिल्या दोन भागांप्रमाणेच हा भागही अस्सल आणि कुटुंबासोबत पाहण्याजोगा असेल.""हा एक असा चित्रपट आहे जो तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत पाहू शकता. एकदा टीव्ही सुरू केला की तुम्हाला काही लपवण्याची गरज नाही. लाजण्याचीही गरज नाही. तुम्हाला माहिती आहे की लोक फक्त हसणार आहेत. मोबाईलवर किंवा टीव्हीवर गुपचूप पाहण्याची गरज भासणार नाही."'हेरा फेरी ३' आता अधिकृतपणे मूळ तिघांच्या सहभागासह तयार होत आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट पूर्वीच्या दोन्ही भागांप्रमाणेच धमाल आणि मजेदार असेल, असा विश्वास कलाकारांकडून व्यक्त केला जात आहे.