पेरलं पण अंकुर फुटेना : दुबार पेरणीचं संकट

02 Jul 2025 21:28:53
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Double sowing : तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतकèयांनी खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरणी केली. पेरणीनंतर आठवड्यानंतरही अंकुर न फुटल्यामुळे शेतकèयांनी कृषी केंद्र चालकाकडे व पांढरकवडा तालुका कृषी विभागांकडे तक्रार केली आहे. या तक्रारींची दखल घेत कृषी केंद्रचालक यांनी बुस्टर हुतूतू या कंपनीच्या एजन्टला संपर्क करून विविध गावांमध्ये आपल्या कंपनीचे बियाणे उगवले नसल्याची माहिती दिली. एजन्टने सर्व गावांत जाऊन शेतात पाहणी करून कंपनीला ऑनलाईन तक्रार केली आहे.
 
 
kl
 
बुस्टर हुतूतू बियाण्यांमध्ये दोष असल्याचे स्पष्ट आहे. पण कृषी विभाग या तक्रारीला गंभीरपणे घेत नाही आहे. अजूनही कृषी विभागाकडून कुठलाही पंचनामा करण्यात आला नाही. गाढ झोपेत असलेल्या कृषी विभागाला जाग येणार की नाही असा प्रश्न शेतकरी करीत आहेत.
या प्रकारामुळे शेतकèयांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी कर्ज काढून बियाणं खरेदी केलं होतं. मात्र बियाणं उगवलंच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे मजुरी, बियाणं, खते अशा सर्व गोष्टींवर दुहेरी खर्च होणार आहे.
शेतकèयांच्या मते, बुस्टर हुतूतू सारख्या नावाजलेल्या बियाण्यावर विश्वास ठेवला तरी असा फसवणुकीचा अनुभव येतो आहे. बुस्टर हुतूतूकडून फसगत झालेले दिलीप झिले हे काही एकमेव शेतकरी नाहीत. त्यांच्यासोबत केळापूर तालुक्यातील अनेक शेतकèयांना हा दणका बसला आहे.
विशेषकरून बुस्टर हुतूतूच्या सोयाबीनच्या बियाण्यांबद्दल शेतकèयांच्या तक्रारी आहेत. आता कृषी विभाग यावर काय कारवाई करणार याकडे शेतकèयांचे लक्ष लागले आहे.
कारवाई करणार
 
 
या शेतकèयाची तक्रार कालच आली आहे. आज यवतमाळ येथे बैठकीसाठी आलो आहे. मी इथून आल्यानंतर काय आहे याची चौकशी करून योग्य ती कारवाई करतो, असे पांढरकवडा कृषी अधिकारी बळवंतकर यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0