गणित ओलंपियाड परीक्षेत हडस प्रायमरी अँड हायस्कूलचे सुयश

    दिनांक :21-Jul-2025
Total Views |
नागपूर,
Hadas Primary and High School हडस प्रायमरी अँड हायस्कूल येथे सन २०२४-२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या SOF (Science Olympiad Foundation) गणित ऑलिम्पियाड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पदक व प्रमाणपत्र वितरणाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाविषयी गोडी निर्माण व्हावी, तसेच त्यांची विषयाबाबतची भीती दूर व्हावी, या उद्देशाने शाळेच्या मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांच्या पुढाकाराने व प्रोत्साहनाने ही परीक्षा यशस्वीरीत्या राबविण्यात आली.
 
Hadas Primary and High School
 
या स्पर्धात्मक परीक्षेत चौथी ते दहावीपर्यंतच्या एकूण 67 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांनी केवळ सहभागच नव्हे तर उल्लेखनीय कामगिरीही बजावली. Hadas Primary and High School विशेष म्हणजे, यामध्ये व्योम भिसिकर (इयत्ता चौथी), तनय निंगोट, वंशिका गजघाटे, तन्वी तिजारे (सातवी), तेजस डाखोळे (आठवी) आणि सागर पंधराम (नववी) या सहा विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल केले.
 
या घवघवीत यशामागे शाळेतील शिक्षकांचे अथक मार्गदर्शन आहे. मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांच्यासह गणित विषयाच्या शिक्षिका निधी मुळे आणि आरती बोरकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य, प्रेरणा आणि योग्य दिशा दिल्यामुळेच हे यश शक्य झाले. Hadas Primary and High School कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीची पावती मिळाली असून, शाळेच्या यशात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. गणित विषयाबद्दल उत्सुकता निर्माण करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चितच साध्य होईल, असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
 
सौजन्य: गजानन रानडे, संपर्क मित्र