भारतीय संस्कृती टिकविण्यात महिलांचे योगदान मोठे: राधेश्याम चांडक

21 Jul 2025 20:21:06
बुलडाणा,
Radheshyam Chandak श्रावण महिना हा हिंदू वर्षातील एक पवित्र महीना मानल्या जातो. भगवान शंकराचा अत्यंत प्रिय असलेला हा महिना आहे आणि या महिन्यात शंकराची पुजा अर्चा, उपवास, अभिषेक, इत्यादी धार्मिक विधी केले जातात. हे सर्व धार्मिक विधी पार पाडता यावे म्हणुन सदभावाना सेवा समितीने बालसंत दिपशरणजी महाराज, चित्रकुट, यांची श्री शिवमहापुराण कथा दि.४ ऑगष्ट ते १० ऑगष्ट पर्यंत वारकरी भवन, सर्युलर रोड, बुलडाणा येथे आयोजित केली आहे. भारतीय संस्कृत टिकविण्यात महिलांचे योगदान मोठे आहे असे प्रशंसनीय उदगार सदभावाना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी काढले.
 
 
Radheshyam Chandak
 
या संदर्भात नुकतीच जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी भवन येथे महिलांची सभा घेण्यात आली. सर्व समाजाच्या महिला मंडळांनी भाग घेवून चर्चा केली. Radheshyam Chandak कथेच्या सातही दिवसाची जबाबदारी महिलांनी स्विकारली. कथेमध्ये सर्व व्यवस्था चोख ठेवावी व ही कथा आनंदोत्सव करावा अश्या सुचना यावेळी केल्या. महिलांच्या सभेत चंपालाल शर्मा, प्रकाशचंद्र पाठक यांनी मार्गदर्शन केले.
 
 
महिलांमध्ये अंजली पराजंपे, माधुरी घोरपडे, शुभांगी चंदन, निलम बाहेती, भारती झंवर, मुक्ता पाटील, शीतल सोनुने, रोहिणी काटकर, कुंदा पाटील, सुनंदा कावळे, कल्पना किनगे, संध्या मिश्रा, सरोज चांडक, सावित्रीबाई काळे, इत्यादी महिला चर्चेत सहभाग घेऊन सुचना केल्या सदभावना सेवा समितीने आयोजित केलेल्या शिवमहापुरान कथेचा श्रावण Radheshyam Chandak महिन्यात सर्वांनी लाभ घेवून पुण्य प्राप्त करावे आणि परमानंद प्राप्त करावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी यावेळी केले. लाला माधवणी यांनी आभार प्रदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0