गुणवंत विद्यार्थ्यांचा भारतीय विचार मंच युवा आयाम तर्फे सत्कार

22 Jul 2025 19:31:15
नागपूर,
Bharatiya Vikha Manch Yuva भारतीय विचार मंच युवा आयाम, नागपूरच्या वतीने नुकताच दोन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. १० वी उत्तीर्ण . पूनम परेश दिंडा आणि १२ वी उत्तीर्ण रोहित परेश दिंडा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही या विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे.राजेंद्र हायस्कूल, कोठी रोड, महाल शाळेचे विद्यार्थी आहेत. पूनम हिने कोणतीही खासगी शिकवणी न लावता घरीच अभ्यास करून १० वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवले आहेत. हे तिच्या मेहनतीचे आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण ठरते.
 
 

divan  
 
 
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.Bharatiya Vikha Manch Yuvaसंस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे सत्कार उपयुक्त ठरत असल्याचे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
 
सौजन्य: भाग्यश्री दिवाण ,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0