देवेंद्रजी नावाचे अत्तर!

    दिनांक :22-Jul-2025
Total Views |
चंद्रशेखर बावनकुळे
 
 
Devendraji's best wishes from Bawankule देवेंद्रजींचा सहवास अत्तरासारखा आहे. अत्तर हे नुसते सुगंधी द्रव्यच नाही तर, अत्तर म्हणजे भावना, परंपरा, आपुलकीचा आनंद वाटणारा एक अनमोल घटक. एक सकारात्मक ऊर्जा अत्तराचा सुगंध निर्माण करतो. माझ्यासाठी असेच आहेत देवेंद्रजी. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक बलाढ्य, बुद्धिमान आणि लोककल्याणकारी नेता. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आता वेगवान झाला. महाराष्ट्र आता थांबणार नाही.
 
 
Devendraji
 
महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विधिमंडळ संयुक्त चिकित्सा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे विधेयक समाजाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च आहे. समितीचे कामकाज करताना मला, माझ्या 21 वर्षांच्या विधिमंडळ कामकाजातील एक वेगळा अनुभव ठरला. महाराष्ट्रातील सर्वांचेच या विधेयकाकडे लक्ष वेधून होते. कायद्याचा दुरुपयोग होणार नाही, ही दक्षता तर घ्यायचीच होती. त्याचवेळी भारतीय संविधानाचे रक्षण करायचे होते. कडवी डावी विचारसरणी असलेले व भारतीय संविधानाविरुद्ध चीड निर्माण करणारे लोक आपल्या समाजाची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तीविरुद्ध कायदेशीरदृष्ट्या दोन हात करण्याची तयारी सरकारने या निमित्ताने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नक्षलवादाविरुद्ध ही लढाई सुरू झाली. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्या भागात अनेकदा ते मुक्कामी असतात. त्यांनी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याच प्रयत्नाची पुढची पायरी म्हणजे, विशेष जनसुरक्षा विधेयक. जंगलात असलेला क्रूर नक्षलवाद आता शहरात आला आहे. त्याचे स्वरूप पांढरपेशे असल्याने समाजासाठी ते अधिक काळजी करणारे आहे. समाजविघातक कारवाई करणाèया 64 संघटना महाराष्ट्रात आहेत. आणलेला कायदा हा भारतातील इतर राज्यांत अस्तित्वात असलेल्या कायद्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह आहे. या महत्त्वाच्या कायद्याच्या निर्मिती प्रक्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले, याची पूर्ण जाणीव मला आहे. महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील महत्त्वाचे पान म्हणजे हे कामकाज आहे.
या प्रोत्साहन प्रक्रियेतील बीजे 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा पेरली गेली. मला आठवते, राजकारणात कार्यकर्ता व आंदोलनाचा अनुभव असूनही विधिमंडळाच्या कामकाजाचे बारकावे मला माहिती नव्हते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मला मार्गदर्शन केले. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारी निधी कसा खेचून आणायचा यासाठी वेगवेगळी संसदीय आयुधे आणि जे कौशल्य लागते त्याबाबत ते मला वेळोवेळी सांगायचे. काहींशी जन्माचे ऋणानुबंध जुळतात, पक्की नाती तयार होतात. ही नाती रक्ताच्या नात्यापलीकडची असतात. देवेंद्र फडणवीस हे नाते याचपद्धतीचे. रक्ताच्या नात्यापलीकडचे.
देवेंद्र फडणवीस आणि माझा परिचय मागील 35 वर्षांपासून आहे. मी अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलो आहे. भारतीय जनता पार्टीत मी कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा माझ्यातील कार्यकर्त्याला घडवले, मला संस्कारित केले आणि माझ्या कारकीर्दीला नवा आयाम देण्याचे काम केले ते ज्येष्ठ नेते नितीनजी गडकरी यांनी. नितीनजी आणि माझ्या वयात खूप अंतर होते; त्यामुळे मी कायमस्वरूपी त्यांना पितृस्थानी मानत आलो आहे. Devendraji's best wishes from Bawankule बापाचा एकप्रकारचा धाक असतो आणि त्याच्याशी अनेक गोष्टी बोलता येत नाहीत; त्या भावाशी मात्र सहजपणे करता येतात. राजकारणात माझ्या भावाची ही भूमिका जर कुणी पार पडली असेल तर ते आहेत देवेंद्र फडणवीस!
2014 मध्ये ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मला ऊर्जामंत्री व उत्पादन शुल्क मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. माझी ऊर्जामंत्री म्हणून पाच वर्षांची कारकीर्द त्यांच्या सोबतीनेच केवळ यशस्वी झाली, असे आता विचार करताना वाटते. त्या पाच वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक प्रशासकीय बारकावे मला शिकायला मिळाले. आता, त्यांच्याच विश्वासामुळे नागपूर व अमरावती जिल्ह्यांचा पालकमंत्री आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी त्यांचे भगीरथ प्रयत्न सुरू असल्याचे आपण बघत असतो. गेली तीन वर्षे मी भाजपचा प्रदेश अध्यक्ष होतो. अनेक मान्यवरांनी हे पद भूषविले होते. त्यामुळे थोडेफार दडपण होतेच. देवेंद्रजींनी हे दडपण घालविले. काही वर्षांपूर्वी त्यांनीसुद्धा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय दमदारपणे सांभाळली होती. त्यादरम्यानचा त्यांचा अनुभव यावेळी मला त्यांनी सांगितला.
आता, राज्याचा महसूल मंत्री म्हणून काम करताना, त्यांच्या सर्वांगीण अभ्यासाची पदोपदी जाणीव होते. महसूल विभागात होत असलेल्या बदलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छाप आहे. एप्रिल महिन्यात पुण्यात झालेल्या महसूल परिषदेनंतर वेगवान पद्धतीने हा विभाग कामी लागला.
मुळात, आर्थिक नियोजन आणि आर्थिक प्रगतीचे यश समाजाच्या शिडीच्या वरच्या बाजूला असलेल्या लोकांद्वारे मोजले जाणार नाही, तर समाजाच्या सर्वांत खालच्या पायरीवरील लोकांद्वारे मोजले जाईल. हा विचार महायुती सरकारचा आहे. सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत 1947 चा तुकडेबंदी कायदा रद्द केला. Devendraji's best wishes from Bawankule मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. यामुळे 1 जानेवारी 2025 पूर्वीच्या 1 हजार चौरस फुटांच्या जमिनींना कायदेशीर मान्यता मिळणार आहे. नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक सुलभतेने होण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राज्यभर राबविले जात आहे. दोनशे रुपयांमध्ये संपूर्ण शेतीची हिस्से मोजणी व पाचशे रुपयांमध्ये वाटणी पत्र देण्याचा निर्णय विभागाने घेतला. यातून शेतकèयांचा आर्थिक भार हलका होऊन त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, वारकèयांसाठी विमा योजना व घरकुलासाठी मोफत वाळू हे निर्णय लोककेंद्रित आहेत. पुण्यात झालेली महसूल अदालत हजारो प्रलंबित प्रकरणांचा निकाल देणारी ठरली.
देवेंद्र फडणवीस यांना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणाची जाण आहे. त्यांनी अनेक राज्यांत निवडणुकीचे व्यवस्थापन केले आहे. संपूर्ण 35 वर्षांच्या कालावधीत मला त्यांच्याकडून एक गोष्ट शिकता आली ती म्हणजे, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही अभ्यासू व चौकस असले पाहिजे. त्यांचे आरोग्यक्षेत्रातील कार्य खूप प्रभावी व अचाट आहे. तसे पाहता मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना 1967 मध्ये झाली; पण 2015 मध्ये देवेंद्रजींनी त्याला नवे परिमाण मिळवून दिले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचारासाठी आर्थिक साहाय्य देण्याचा या निधीचा उद्देश आहे. 2015 मध्ये ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ स्थापन करून या उपक्रमाला गती दिली.
अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल रोडच्या पाठोपाठ मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये एकूण 350 किमीहून अधिक लांबीच्या मेट्रो प्रकल्पांचे जाळे विस्तारत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. मुंबई एअरपोर्ट इंफ्लुएंस नोटीफाईड एरिया म्हणजे, आठ लक्ष रोजगार निर्मिती औद्योगिक वसाहतीचा नैना प्रकल्प, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, आपले सरकार पोर्टल, महाराष्ट्रात 11 वर्षांत अनेक नवीन विमानतळे विकसित झाली. यात अमरावती, सिंधुदुर्ग, शिर्डी, नवी मुंबई अशा अनेक विमानतळांचा समावेश असून यामुळे पर्यटन, उद्योग आणि गुंतवणुकीला नवे गतिमान प्रवेशद्वार मिळाले आहे. कोल्हापूर, अमरावती, शिर्डी, सोलापूर, नांदेड विमानसेवा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप आणि कृषी वाहिनी, निळवंडे, गोसीखुर्द आणि इतर धरणे निर्मिती, मुंबईतील धारावीकरांच्या स्वप्नातलं घर त्यांना मिळवून देण्याच्या उद्देशाने धारावी पुनर्विकास प्रकल्प तयार होतो आहे. येत्या सात वर्षांत 50 हजार घरे तयार केली जाणार आहेत. Devendraji's best wishes from Bawankule प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात 50 लाख कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकारणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत राज्यातील 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. महायुती सरकारने राज्यातील शेतकèयांसाठी शेतीसाठी लागणारी वीज मोफत केली आहे. आता शेतकèयांना एक रुपया देखील वीजबिल भरावे लागणार नाही. शिवाय थकित वीजबिल देखील माफ करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांअंतर्गत राज्यातील एक कोटी पंधरा लाखांहून अधिक शेतकèयांना वार्षिक 12 हजार मिळतात. श्री चक्रधर स्वामींच्या नावाने रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन केले आणि श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ साजरा करण्याचा शासनाचा ऐतिहासिक निर्णयही सरकारने घेतला.
नेतृत्व रात्रीतून घडत नाही. त्यासाठी ध्यास असावा लागतो. ते नगरसेवक म्हणून निवडून आले ते साल होते 1992 ! खरंतर ही निवडणूक 1989 मध्ये होणार होती. पण तेव्हा त्या निवडणुकीत त्यांचं वय भरत नव्हतं. Devendraji's best wishes from Bawankule मात्र त्यांच्या नशिबाने ती निवडणूकच पुढे गेली आणि ते नगरसेवक झाले. वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करताना या माझ्या लोकनेत्याला दीर्घायुष्य मिळो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो; त्यांची प्रगती हीच आमच्यासाठी आनंदाची कुपी आहे. मला आठवते, आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नागपूरने महाराष्ट्राला दिलेली भेट, असे देवेंद्रजींचे वर्णन केले होते. ते यथार्थ आहे.
 
महसूल मंत्री, भाजपा, महाराष्ट्र