गडचिरोली,
Gadchiroli News गडचिरोलीचा चेहरा-मोहरा बदलविण्याचे काम लॉयड्स मेटल्सच्या माध्यमातून होत आहे. आदिवासी लोकांच्या जीवनात लोहप्रकल्पामुळे मोठा बदल घडत आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि हरित विकासाच्या दिशेने गडचिरोली झपाट्याने पुढे चालले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीच्या औद्योगिक वाटचालीचे भवितव्य अधोरेखीत केले. कधीकाळी माओवादाने ग्रासलेला गडचिरोली आता विकासाच्या सिंहद्वारात प्रवेश करत आहे. ‘स्टील हब ऑफ इंडिया’ व्हायचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असून, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड प्रकल्पांच्या माध्यमातून औद्योगिक परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, असेही ना. फडणवीस म्हणाले.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनसरी येथे लॉयड्स मेटल्सच्या 4.5 दशलक्ष टन क्षमतेच्या एकात्मिक स्टील प्लांट, पेलेट प्रकल्प, स्लरी पाइपलाइन, आयर्न ओर ग्राइंडिंग युनिट, सीबीएसई शाळा, 100 खाटांचे रुग्णालय व कर्मचारी वसाहतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला पद्मश्री तुलसी मुंडा, सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, Gadchiroli News लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, आमदार परिणय फुके, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार कृष्णा गजबे, सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, उपपोलिस महानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक निलोत्पल, विद्यापीठ कुलगुरू प्रशांत बोकारे आदींची उपस्थिती होती.
रोजगार, शिक्षण आणि आरोग्याचे ‘लॉयड्स मॉडेल’ या प्रकल्पांमुळे आतापर्यंत 14 हजार स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. महिलांना हाउसकीपिंगपासून ते व्यवस्थापनाच्या पदांपर्यंत संधी मिळाल्या असून त्यांचा वेतनश्रेणी 12 ते 55 हजारापर्यंत आहे. 100 खाटांचे आधुनिक रुग्णालय आणि सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारित शाळा स्थानिकांसाठी शिक्षण व आरोग्याची नवीन दारे उघडणार आहेत. Gadchiroli News आता उपचारासाठी नागपूर-मुंबईला जाण्याची गरज उरणार नाही, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्या दूरदृष्टीचे यावेळी कौतूक केले.
याप्रसंगी आपल्या प्रास्ताविकातून प्रभाकरण यांनी या प्रकल्पाच्या उभारणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हातभार लागल्याचे सांगून सर्वांच्या प्रयत्नाने 4 हजार कोटीचे प्रकल्प उभे राहिल्याचे म्हटले. अतिरिक्त स्टील प्रकल्पाच्या माध्यमातून 20 हजार लोकांना रोजगार देणार असून गडचिरोलीचा विकास करण्याची संधी आपल्याला लाभली असल्याचे म्हटले आहे. याशिवाय या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी माझे कर्मचारी सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. Gadchiroli News तसेच ते केवळ कर्मचारी नसून ते या उद्योग समूहाचे भागिदार असल्याचेही नमूद केले असून देशातील चौथा व राज्यातील पहिला स्लरी प्रकल्प उभारणारा लॉयड्स मेटल्स एकमेव ठरला आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ग्रीन गडचिरोली’ची संकल्पना
स्लरी पाइपलाइनमुळे 55 टक्के कार्बन घट 85 किमी लांबीची आणि 10 एमटीपीए क्षमतेची स्लरी पाइपलाइन पर्यावरणपूरक पाऊल ठरणार आहे. यामुळे प्रदूषणात 55 टक्के घट, तर इंधनखर्चात मोठी बचत होणार आहे. Gadchiroli News मुख्यमंत्री म्हणाले, गडचिरोलीत झाडांची कत्तल नव्हे, तर पुढील दोन वर्षांत एक कोटी वृक्ष लागवड आमचे उद्दिष्ट आहे.