नागपूर,
Nagpur Garden Club गार्डन क्लबने २०२५-२०२६ या कार्यकाळासाठी नव्या कार्यकारी समितीची अधिकृत घोषणा केली आहे. क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. बागकाम, पर्यावरणीय शाश्वतता आणि नागरी सहभाग या क्षेत्रांत कार्यरत असलेले अनुभवी व उत्साही सदस्य नव्या नेतृत्वात स्थानापन्न झाले आहेत.नवीन कार्यकारी समितीत खालील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.अध्यक्ष: अनुजा परचुरे,उपाध्यक्ष: डॉ. सुनीता शर्मा व डॉ. राजश्री बापट ,सचिव समित अदमने ,कोषाध्यक्ष नितीन दाते,सहसचिव: रेखा देशमुख व तन्मय गोडघाटे कार्यकारी सदस्य: डॉ. अशोक पाठक, डॉ. मनीषा कुलकर्णी, नदीम रहमान, आणि प्रशांत तेलंग
यावेळी आपल्या भाषणात ,क्लबच्या नव्या अध्यक्ष अनुजा परचुरे यांनी सांगितले, “पर्यावरण जागरूकता आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट राहील.Nagpur Garden Club नागपूर गार्डन क्लब हा केवळ बागकामापुरता मर्यादित न राहता, शहराच्या हरित विकासात सक्रीय भूमिका बजावतो आहे.”क्लब लवकरच वृक्षारोपण, बागकाम प्रशिक्षण, शालेय पर्यावरण शिबिरे आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या उपक्रमांचे आयोजन करणार आहे.
सौजन्य:नितीन दाते,संपर्क मित्र