सुनीता भितकर यांना ‘आयकॉन द बेस्ट इंडियन वुमन अवार्ड’

22 Jul 2025 21:38:28
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sunita-bhitkar : राष्ट्रीय जीवन भरारी संमेलन 2025 या ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात नॅशनल टॅलेंट बुक ऑफ ह्युमन रेकॉर्ड सम्यक वैद्यकीय व शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील प्रसिद्ध फॅशन डिझाईनर सुनीता भगवान भितकर यांना ‘आयकॉन द बेस्ट इंडियन वुमन अवार्ड’ देऊन गौरवण्यात आले.
 
 
 
y22July-Sunita-Bhitkar
 
 
 
आपले जीवनशैलीत दुसèयांच्या हक्कांसाठी आणि राष्ट्रवादी विकासाच्या उन्नतीसाठी सतत धडपडत महिलांना स्वयंरोजगार निर्मितीचे कार्य करीत असल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार सिनेअभिनेते शेखर फडके, दिग्दर्शक श्रेयस शिर्के, राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त माजी सैनिक तुकाराम पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
 
 
फॅशन डिझायनर सुनीता भितकर यांना यापूर्वीसुद्धा अनेक संस्थांनी आणि शासनाने पुरस्कार देऊन यांच्या कार्याची दखल घेतली आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Powered By Sangraha 9.0