काका-पुतने लेंडी नाल्यात गेले वाहून...काका वाचले पुतण्याचा मृत्यू

पंचगव्हाण फाटा ते निंभोरा बु.दरम्यानची घटना

    दिनांक :22-Jul-2025
Total Views |
अकोला,
swept away in the Lendi drain तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण फाटा ते निंभोरा बु दरम्यान असलेल्या लेंडी नाल्याला सोमवारी रात्री आठच्या सुमारास पूर आला.रात्री च्या अंधारात पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करणारा १७ वर्षीय युवक दुचाकीसह वाहून गेला.मंगळवारी घटनास्थळावरून काही अंतरावर या युवकाचा मृतदेह आढळून आला. या दुर्दैवी घटनेमुळे पंचगव्हाण उबारखेड गावात शोककळा पसरली आहे. तेल्हारा तालुक्यात दिवसाआड जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास देखील या भागात पाऊस झाला.त्यामुळे नाल्याला देखील पूर आला.दरम्यान पंचगव्हाण उबारखेड येथील मिलिंद गवारगुरु व वैभव गवारगुरु हे दोघे काका-पुतणे आपल्या निंभोरा मार्गावरील शेतात गेले होते.
 

swept away in the Lendi drain 
 
घरी परत येत असताना मधात असलेल्या लेंडी नाल्याला पूर आला रात्रीचा त्या ठिकाणी अंधार असल्याने पाण्याचा अंदाज दोघांनाही आला नसावा. त्यामुळे त्यांनी दुचाकी पाण्यात टाकली असता दोघेही वाहून जाऊ लागले. दरम्यान काका मिलिंद गवारगुरु यांचा एका झुडपाला हात लागला.त्यामुळे त्यांनी ते झुळूक पकडून ठेवले तर पुतण्या वाहून गेला रात्रभर गावकऱ्यांनी शोधा शोध घेतली मात्र आढळून आला नाही.अखेर सकाळी काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. पंचनामा झाल्यानंतर नंतर तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शैवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती आहे.या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
 
 
 
काका-पुतणे दुचाकीने येत होते घरी
प्राप्त माहितीनुसार मिलिंद गवारगुरु व त्यांचा पुतण्या वैभव मनोज गवारगुरु (१७) हे दोघे शेतातून घरी पंचगव्हाण उबारखेड येथे येत असताना मधात येणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आला. swept away in the Lendi drain रात्रीची वेळ असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पुलावर दुचाकी टाकली असता ते यामध्ये दोघे काका पुतणेही दुचाकीसह वाहून गेले मात्र काकाने एका झुडपाला पकडले असता सुदैवाने ते वाचले मात्र दुर्दैवाने पुतण्या वैभव हा पाण्यात वाहून गेला.
 
 
मृतक वैभव गवारगुरु हा काल नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात मोटार सायकलसह वाहून गेला होता आज मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. सध्या तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात मृतकाच्या पोस्टमार्टमची प्रक्रिया सुरू आहे.-समाधान सोनवणे, तहसीलदार,तेल्हारा