मुंबई,
Ashish Chanchlani प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानी काही काळापूर्वी चर्चेत आला होता आणि त्यामागचं कारण होतं त्याचं प्रेमजीवन. आशिषने अभिनेत्री एली अवरामसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने कॅप्शन दिलं होतं – "शेवटी." या फोटोमुळे दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे, अशी चर्चा जोरात सुरू झाली. चाहत्यांनी आशिष आणि एलीला शुभेच्छाही दिल्या. मात्र काही वेळातच या गोष्टीचं सत्य समोर आलं.
खरंतर, हा फोटो आणि त्यामागील सगळं प्रकरण हे आशिषच्या नवीन म्युझिक व्हिडिओ ‘चंदनिया’च्या प्रमोशनचा भाग होतं. आशिषने नंतर स्वतः स्पष्ट केलं की त्याचा हेतू केवळ एक मजेदार खोडकर पोस्ट करणं हा होता. त्याला कल्पनाही नव्हती की लोक यावर इतकं विश्वास ठेवतील आणि त्याला खरंच एलीसोबत रिलेशनशिपमध्ये समजतील.अलिकडेच, आशिष आणि एलीने एकत्र इंस्टाग्राम लाईव्ह सेशन केलं आणि त्यांच्या फोटोमागचं खरं सत्य चाहत्यांसमोर मांडलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्यात काहीही रोमँटिक नातं नाही, ते केवळ चांगले मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या खोडकर पोस्टला मिळालेल्या प्रेमाबद्दल एकमेकांचे आभारही मानले.या लाईव्ह दरम्यान, आशिषने मस्करी करत एलीला विचारलं की तिला त्याच्याशी डेट करायचं आहे का. एलीने हसून दुर्लक्ष केलं आणि त्यावर आशिष म्हणाला, “मी या व्यक्तीला कधीही डेट करू शकत नाही, मला वेड्या कुत्र्याने चावलेले नाही. कारण, एलीसोबत काम करणे म्हणजे सिंहाच्या तोंडात हात घालण्यासारखं आहे. तिच्यासोबत काम करणं खूप कठीण आहे.”
त्याने असंही सांगितलं की, ही पोस्ट करताना एलीचे पालकही यामध्ये सामील होते आणि त्यांना या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती होती. मात्र अनेकांनी दोघांचे अभिनंदन केलं, हे पाहून त्यांनाही हसू आलं.शेवटी, आशिष आणि एली दोघांनीही सांगितलं की त्यांचं नातं फक्त मैत्रीचं आहे आणि त्यापलीकडे काहीच नाही. हे सगळं केवळ एक मजेशीर प्रमोशनल स्टंट होतं, ज्यावर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या.