सावनात गाजतंय मनोज तिवारींचं नवीन भोजपुरी भक्तिगीत

23 Jul 2025 12:20:59
मुंबई,
Manoj Tiwari भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी सावन महिन्याच्या निमित्ताने एक नविन भक्तिगीत सादर केले आहे. ‘हर दम बोल शिव बम बम’ असे या गाण्याचे नाव असून, २१ जुलै रोजी संध्याकाळी युट्यूबवर ते रिलीज झाले. गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि सोशल मीडियावरही ते प्रचंड व्हायरल झाले आहे.
 
 
Manoj Tiwari
हे गाणे महादेवाच्या भक्तीने ओतप्रोत भरलेले असून, त्यात पारंपरिक कांवड शैलीचा नृत्यरस आणि भक्तिभाव दोन्ही पाहायला मिळतो. मनोज तिवारी यांनी स्वतः हे गाणे गायले असून, त्यात त्यांचा भक्तीमय अविष्कार स्पष्टपणे दिसतो. गाण्याचे बोल प्रफुल्ल तिवारी यांनी लिहिले आहेत, तर संगीत आनंद मधुरकर यांचे आहे. सागर जैक यांनी गाण्याचे दिग्दर्शन केले आहे आणि संकल्पना सुरभि तिवारी यांची आहे. गाण्याची निर्मिती ईवा प्रोडक्शन आणि सांविका फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने झाली आहे.गाण्याचे पोस्टर ‘Sounds OG भोजपुरी’ या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले होते, आणि त्यातच गाण्याच्या उत्साही वातावरणाची झलक दिसून आली होती. गाण्याच्या माध्यमातून महादेवाच्या भक्तांना सावन महिन्यातील आध्यात्मिक उर्जा अनुभवायला मिळत आहे. मंदिरांमध्ये, कांवड यात्रांमध्ये आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये या गाण्याचे विशेष महत्त्व दिसून येत आहे.मनोज तिवारी हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय असले तरी, संगीत आणि अभिनयाप्रती त्यांची नाळ अजूनही तशीच घट्ट आहे. वेळोवेळी ते भक्तिगीत, देशभक्तीपर किंवा सांस्कृतिक गीतांच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर आधारित ‘सिंदूर की ललकार’ हे देशभक्तीपर गाणे सादर केले होते, ज्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
‘हर दम बोल शिव बम बम’ हे गाणे सध्या सावन उत्सवाचे आकर्षण ठरत असून, युट्यूबवरील लाखो लोकांनी ते पाहिले आहे. भक्तिभाव, नृत्य आणि पारंपरिक संगीताचा संगम असलेले हे गाणे महादेव भक्तांसाठी एक खास भक्तिपर अनुभव ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0