म्हणून 'त्या' रिसेप्शनिस्टला मारलं; कल्याणमधील हाणामारी प्रकरणाला नवे वळण

    दिनांक :23-Jul-2025
Total Views |
कल्याण, 
kalyan-receptionist-case कल्याण येथील एका खासगी रुग्णालयात घडलेली हिंसक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका व्यक्तीने रुग्णालयातील महिला रिसेप्शनिस्टला मारहाण करताना दिसत होता. या घटनेनंतर संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली होती, आणि आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत होती.
 
kalyan-receptionist-case
 
पोलिसांनीही त्वरीत गुन्हा दाखल करून आरोपी गोकुळ झा याला अटक केली. तो पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती असल्याचे उघड झाले होते. या घटनेने वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांकडे सादर करण्यात आलेल्या नव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही वेगळीच माहिती समोर आली आहे. kalyan-receptionist-case त्या फुटेजनुसार, मारहाण होण्यापूर्वी संबंधित महिला रिसेप्शनिस्टने गोकुळ झा याच्या वहिनीला थापड मारल्याचे स्पष्टपणे दिसते. यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या प्रकरणात आता रिसेप्शनिस्टचाही सहभाग असल्याचा संशय निर्माण झाला आहे. या नव्या खुलास्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत, आता दोन्ही बाजूंच्या तक्रारींचा अभ्यास सुरू केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर साक्षीदारांचीही चौकशी केली जात आहे.