नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

    दिनांक :23-Jul-2025
Total Views |
पुणे,  
lokmanya-tilak-national-award केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या देशहितासाठीच्या दीर्घ आणि विकासाभिमुख योगदानाचा गौरव केला जाणार आहे. हा पुरस्कार १ ऑगस्ट २०२५ रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी साडे दहा वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना प्रदान केला जाईल.
 
 
lokmanya-tilak-national-award
 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारक ट्रस्ट या पुरस्काराचे आयोजन करते. lokmanya-tilak-national-award ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत गडकरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “नितीन गडकरी यांनी आपल्या कारकीर्दीत केवळ राजकारणच नव्हे, तर पायाभूत सुविधांच्या विकासामार्फत देशाच्या आर्थिक प्रगतीस हातभार लावला आहे. त्यांचे कार्य हे टिळकांच्या राष्ट्रहितासाठीच्या विचारांशी सुसंगत आहे.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.
 
‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ ही देशातील एक अत्यंत मानाची सन्मानना आहे. दरवर्षी १ ऑगस्ट, म्हणजेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, या दिवशी हा पुरस्कार दिला जातो. lokmanya-tilak-national-award या पुरस्काराने यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांना गौरवण्यात आले आहे. या पुरस्काराबरोबर १ लाख रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.