तभा वृत्तसेवा
आर्णी,
robbed-a-farmer : नागपूर-तुळजापूर महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ शेतात पीक पाहणी करणाèया शेतकèयाला आम्ही पोलिस अधिकारी आहोत, असे सांगून शेतकèयाचा 38 हजार 950 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल घेऊन दोन भामटे दुचाकीने पसार झाले. ही घटना सोमवारी जवळा येथे घडली.
या प्रकरणी भारत बैस (जवळा) यांच्या तक्रारीवरुन दोन अज्ञात आरोपींविरोधात मंगळवारी (ता. 22) आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारत बैस (वय 65) हे जवळ्याहून स्कूटीने त्यांच्या आर्णी रस्त्यावरील शेतात गेले होते. शेताची पाहणी करीत असताना दोन अनोळखी व्यक्ती मोटरसायकल घेऊन आले.
त्यांनी बैस यांच्याजवळ थांबून त्यांनी गळ्यात व हातात सोन्याची साखळी व अंगठी का घातली आहे, आम्ही पोलिस अधिकारी आहोत, असे म्हणून त्यांच्याकडील दागिने काढून ते त्यांच्या रुमाल व कागदात बांधून बैस यांना परत दिली व ते दुचाकीने निघून गेले.
बैस यांनी नंतर ती पुडी उघडून पाहिली असता त्यातील सोन्याची साखळी, अंगठी हे सर्व गायब होते. एकूण वजन 10 ग्रॅम वजनाचे सोने किंमत 26 हजार 500 रुपये एक 4 ग्रॅम 510 मिलीग्रॅम वजनाची अंगठी, तसेच एक साधी पितळी अंगठी किंमत अंदाजे 200 रुपये असा एकूण 38 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल या भामट्यांनी लांबविला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसèया दिवशी आर्णी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रशांत देशमुख करीत आहेत.