सावित्रीच्या लेकींसाठी तीन वर्षांच्या खंडानंतर सुरू झाली एसटी बस

23 Jul 2025 18:56:47
मानोरा,
st-bus-service तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींना तालुयाच्या ठिकाणात शालेय शिक्षण घेण्यासाठी गरजेची असलेली बस सेवा मागील तीन वर्षांपासून खंडित होती ती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या अथक पाठपुराव्यानंतर आता सुरू करण्यात आली असून या शालेय बस फेरीमुळे खापरी, खंडाळा, धानोरा पारधी तांडा, गोरेगाव भोईनी आदी गावातील सावित्रीच्या लेकींची सोय होणार आहे.
 
 
 
sT
 
 
मानोरा शहरातील विविध माध्यमिक शाळांमध्ये उपरोक्त गावे व तांड्यांमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या असंख्य मुली दररोज शिक्षणासाठी येतात व सायंकाळी या मुलींना मोहिनी पर्यंत बस सेवा उपलब्ध होते मात्र भोईनीवरून खंडाळा,खापरी, पारधी तांडा, गोरेगाव, धानोरा या गावापर्यंत पायपीट करण्याशिवाय मागील तीन वर्षांपासून पर्याय नव्हता.खापरी या गावातील २० ते २५ मुली दररोज शिक्षणासाठी मानोरा येथे जातात पारधी तांडा येथील दहा ते बारा मुली, खंडाळा, धानोरा येथील सुद्धा दहा ते बारा मुली अशा एकूण ५० पेक्षा अधिक मुली दररोज शिक्षणासाठी मानोरा येथे ही जा करीत असतात मात्र त्यांना प्रवासासाठी सुरक्षित वाहनाची सोय नसल्याने या मुलींना मागील तीन वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत होता.
खापरी येथील रामजीवन मदन राठोड या सामाजिक कार्यकर्त्यांनी इतरांच्या मदतीने उपरोक्त गावी व तांड्यातील मुलींसाठी राज्य परिवहन महामंडळाची शालेय फेरी सुरू व्हावी यासाठी महामंडळ प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याची दखल घेण्यात येऊन आता उपरोक्त गावांमार्गे कारजा ते मानोरा ही शालेय बसफेरी सुरू करण्यात आली आहे.st-bus-service मुलींना शाळेत नेण्यासाठी आलेल्या एसटी बस च्या चालक वाहका सह स्थानिक महिलेच्या द्वारा पूजा करण्यात आली. खापरी येथे यावेळी शालेय विद्यार्थिनी व गावातील रामजीवण राठोड,लीलाधर चव्हाण, सुनील पवार, पंकज पवार आदी नागरिक सुद्धा उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0